Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते, कुस्तीपटू खाशाबा जाधव

Webdunia
मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (18:57 IST)
social media
भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते, कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस म्हणजे १५ जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच, क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत घसघशीत वाढ करणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. ते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.मग जाणून घेऊ कोण होते कुस्तीपटू खाशाबा जाधव
 
भारताला १९५२ साली पार पडलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत पहिलं वैयक्तिक कांस्य पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव या कुस्तीपटूंनबद्दल विशेष गोष्ट हि कि भारताला तंत्र्य मिळाल्यानंतर हे पहिलं वैयक्तिक ऑलम्पिक कांस्य पदक त्यांनी आपल्या भारताला मिळवून दिलं .

सातारा जिल्ह्यातील एका लहान गावात जन्माला आलेल्या खाशाबांना कुस्तीचं बाळकडू घरातच मिळालं. त्यांचे आजोबा आणि त्यांचे वडील दादासाहेब सुद्धा उत्तम कुस्तीपटू होते.
वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षापासूनच खाशाबा कुस्तीतील बारकावे शिकू लागले.
वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षीच एका प्रसिद्ध पहिलवानाला चितपट करून खाशाबांनी सर्वाना आपली दखल घेण्यास भाग पाडलं.
 
पुढे सर्वदूर होणाऱ्या कुस्तीत सहभाग घेऊन खाशाबा मातब्बरांना धूळ चारू लागले.कराड येथील टिळक विद्यापीठात १९४० ते १९४७ दरम्यान शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर खाशाबांनी आपलं संपूर्ण लक्ष कुस्तीवर केंद्रित केलं .खाशाबांच्या कुस्तीतील कामगिरिची चर्चा सगळीकडे होऊ लागली.
 
त्यांच्यातील प्रतिभा ओळखून कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर यांना खाशाबा मध्ये असलेल्या गुणांचं चीज व्हावं असं मनोमन वाटून गेलं
खाशाबांच्या वडीलांना देखील हि चांगली संधी असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी घरची शेती गहाण ठेवून खाशाबांना कुस्तीतील पुढच्या प्रशिक्षणासाठी कोल्हापूरला पाठवलं.
कोल्हापूरच्या मराठा बोर्डिंग इथं राहून खाशाबा शिक्षण आणि तालीम यांचा अचूक मेळ बसवू लागले.गोविंद पुरंदरे या क्रीडा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाने त्यांचा ऑलम्पिक स्पर्धेचा मार्ग सुकर झाला.
फ्लायवेट गटाकरता खाशाबांची लंडन ऑलम्पिक मध्ये १९४८ ला जेंव्हा निवड झाली त्यावेळी ते सहाव्या क्रमांकावर होते. इथवर पोहोचणारे भारतातील ते पहिले खेळाडू होते.
खाशाबा गादीवरचा कुस्तीप्रकार शिकलेले असल्याने आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे आणि तेथील नियमांचे त्यांना फारसे ज्ञान नव्हते. आणि त्यामुळे त्यांना पुढची फेरी देखील गाठता आली नाही.
पण त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे १९५२ ला हेलसिंकी हि फिनलंड ची राजधानी असलेल्या ठिकाणी ज्यावेळी ऑलम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तेंव्हा खाशाबा पूर्ण तयारीनिशी कुस्तीच्या रिंगणात उतरले होते.हेलसिंकी इथं स्पर्धेला जाण्यासाठी पैसे नसल्याने गावकरी मंडळी यांनी लोकवर्गणी करून, ओळखीच्या लोकांनी त्यांना जमेल तशी मदत करून पैसे उभे केले.
करिअर
प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर सरांनी तर खाशाबाला ऑलम्पिक स्पर्धेला जाता यावं यासाठी स्वतःचं घर गहाण ठेऊन ७००० रुपये उभे केले.
खाशाबांचे कोल्हापूर चे प्रशिक्षक गोविंद पुरंदरे यांनी देखील ३००० रुपयांची जमवाजमव केली अन खाशाबा ऑलम्पिक स्पर्धेला जाऊ शकले .
त्या स्पर्धेत विविध देशातील २४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
खाशाबांनी मेक्सिको, जर्मनी, कॅनडा येथील स्पर्धकांना नमवून सेमी फायनल पर्यंत मजल मारली.आंतरराष्ट्रीय राजकारण आडवं आलं नसतं तर खाशाबा सुवर्णपदक घेऊनच परतले असते.
पण त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं तरीदेखील हि बाब देखील कमी महत्वाची ठरत नाही कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ऑलम्पिक स्पर्धेतील हे पहिलं वैयक्तिक पदक ठरलं होतं.खाशाबांच्या नावावर हा रेकॉर्ड जवळपास ४४ वर्ष कायम होता.
लियांडर पेस या टेनिस पटूचं नाव दुसऱ्या क्रमांकावर १९९६ साली या यादीत समाविष्ट झालं.
पदक पटकावून ज्यावेळी खाशाबा मायदेशी परतले त्यावेळी कराड रेल्वेस्थानकावर त्यांचे फार मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत करण्यात आले होते.
शेकडो बैलगाड्या… ढोलताशे…. लेझीम पथकं… आतिषबाजी फटाके यांच्या धामधुमीत खाशाबांच्या गोळेश्वर या गावापर्यंत जंगी मिरवणूक निघाली.
खाशाबांच्या या विजयाने त्यांच्या लहानश्या गावाची ओळख संपूर्ण देशभर झाली होती.
 
नाव खाशाबा दादासाहेब जाधव
जन्म (Birthday) १५ जानेवारी १९२६
गाव सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील रेठरे हे गाव
जन्मस्थान गोळेश्वर जिल्हा. सातारा
खेळ कुस्ती

कामगिरी १९५२साली पार पडलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत कुस्तीत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं
मृत्यू १४ ऑगस्ट १९८४ सातारा जिल्ह्यातील कराड इथं
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

अल्लू-अर्जुनच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत सीएम रेवंत रेड्डी यांचे वक्तव्य आले समोर

LIVE: पुण्यात फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडले

मंत्रिमंडळ वाटपनंतर अजित पवारांचे वक्तव्य, म्हणाले काही मंत्री नाराज आहे

पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले

मंत्रिपद मिळताच बावनकुळे ॲक्शन मोडमध्ये, वाळू माफियांबाबत बोलले मोठी गोष्ट

पुढील लेख
Show comments