Festival Posters

देवापेक्षा कर्माची भिती बाळगावी

Webdunia
सोमवार, 18 जानेवारी 2021 (13:51 IST)
नेहमी लक्षात ठेवा
कुणी कुणाचेच नाही
 
सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते
जेव्हा हरण झाले तेव्हा कोणी नव्हते
 
द्रौपदीचे रक्षक पाच पाण्डव होते
वस्त्र हरण झाले, तेव्हा कोणी नव्हते
 
राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते
जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते
 
लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता
पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते
 
श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते
जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते
 
शरशय्या वरती भीष्म पितामह होते
वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते 
 
राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते
पण चक्रयुव्ह मधून काढण्यासाठी कोणी नव्हते
 
सर्वांसाठी, त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे, 
या जगात आपले कोणी ही नाही.
जे विधात्याने लिहिले आणि जसे आपले कर्म आहे
त्या पुढे कोणी जाऊ शकत नाही.
 
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर हेच सत्य आहे.
केवळ कर्मच आपले आहे
देवापेक्षा कर्माची भिती बाळगावी,
एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही
 
फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो, पण उदबत्ती नाही.
कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोण विझवु शकत नाही..

-सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

विकासकामांना मंजुरी देण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाद वाढला

LIVE: विकासकामांना मंजुरी देण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाद वाढला

महापालिका निवडणुकीत काँग्रेसने शरद पवार गट आणि वंचित यांच्यासोबत युती केली

ढाका संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

रुग्णालयाचा निष्काळजीपणा! डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित केले

पुढील लेख
Show comments