Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागतिक लोकसंख्या दिन 2021

Webdunia
रविवार, 11 जुलै 2021 (11:24 IST)
जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो?
वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की जगातील प्रत्येक व्यक्तीने वाढत्या लोकसंख्येकडे लक्ष दिले पाहिजे आणि लोकसंख्या थांबविण्यात आपली भूमिका निभावली पाहिजे. वाढत्या लोकसंख्येने जगातील बर्यालच देशांसमोर मोठ्या समस्येचे रूप धारण केले आहे. त्याचा सर्वात जास्त तोटा विकसनशील देशांना होत आहे लोकसंख्या स्फोट ही एक गंभीर चिंता आहे. या दिवशी लोकांना कौटुंबिक नियोजन, लिंग समानता, मानवी हक्क आणि महिला आरोग्य याबद्दल माहिती दिली जाते.
 
जागतिक लोकसंख्या दिवस का साजरा केला जातो?
11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिलने 1989 मध्ये सुरुवात केली होती. त्यावेळी जगातील लोकसंख्या सुमारे 500 कोटी होती.आणि या वर्षी च 500 कोटीवा बालक जन्माला आले, तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवशी वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम अधोरेखित केले जातात आणि त्याच वेळी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती केले जाते.
हा दिवस 11 जुलै 1990 रोजी 90 हून अधिक देशांमध्ये प्रथम साजरा करण्यात आला. तेव्हापासून बऱ्याच  कार्यालये, इतर संस्था आणि संस्था यांनी सरकार आणि नागरी समाज यांच्या भागीदारीत जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये लोकसंख्या वाढीमुळे होणाऱ्या धोक्यांविषयी लोकांना सावध केले जाते.
 
जागतिक लोकसंख्या दिनावर जनजागृती करण्यासाठी विविध सामाजिक कार्यक्रम व सभा आयोजित केल्या जातात, स्पर्धा, रोड शो, पथनाटके आणि इतर अनेक मार्ग समाविष्ट केले जातात. सध्या चीन आणि भारत हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत.
 
जागतिक लोकसंख्या दिन थीम 2021?
जागतिक लोकसंख्या दिन दिवशी दरवर्षी एका थीमवर काम केलं जातं यावर्षी 11 जुलै 2021 रोजी ची थीम ही 'Rights and Choices are the Answer: Whether baby boom or bust, the solution to shifting fertility rates lies in prioritising all people's reproductive health and rights" अशी या वर्षीची थीम आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख