Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मालाडच्या मंगेश शाळेत कलादालन कार्यशाळा-स्पर्धा-प्रदर्शन

Webdunia
गुरूवार, 18 जानेवारी 2018 (14:03 IST)
शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे तसेच शालेय विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे म्हणून मालाड-पूर्व च्या कुरार गावातील मंगेश विद्या मंदिर मध्ये २० जानेवारीपासून कलादालन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. कलादालन मध्ये ह्यावर्षी वाद्य संगीत-कलावंत शोध अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय कला क्षेत्रातील एका अभिनव अभियानाची ही नांदी असून, मंगेश शाळेतील वादकांचा शोध आणि त्यांच्या टॅलेन्टला वाव देण्यासाठी २० ते २६ जानेवारी या दरम्यान मंगेश शाळेच्या सभागृहात कलादालन- कार्यशाळा-स्पर्धा-प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे कलादालन महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे.
 
मंगेश शाळेला येत्या वर्षी ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. म्हणूनच नावीन्य म्हणून यंदाच्या वर्षापासून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुळात मंगेशी हे मंगेश शाळेच्या बोधचिन्हातील दैवत आणि ह्या दैवताच्या साक्षीने अनेक संगीत कलावंत भारत भूमीला मिळाले आहेत. मंगेशकर घराणे हे त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण. शाळेतील विद्यार्थी आणि शाळेचे माजी विद्यार्थी ह्यांपैकी वाद्य संगीतात 'प्रवीण' असणाऱ्या उद्योन्मुख कलावंताच्या शोध अभियानाने ही स्पर्धा रंगणार आहे. हौशी वाद्य संगीत कलावंतांना शोधून त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी 'मंगेश विद्या मंदिर - माजी विद्यार्थी संघटने'तर्फे हा प्रयत्न होणार आहे. या अभियानात वाद्य संगीत तंतू वाद्ये अर्थात आघाती वाद्ये ज्यात सतार, संतूर, सरोद, मेंडोलीन, गिटार, बेस इलेक्ट्रिक, विचित्र वीणा आणि तत्सम वाद्यांचा समावेश आहे. तंतू वाद्यांमध्ये व्हायोलीन, सारंगी, दिलरूबा, तार शहनाई आणि तत्सम वाद्ये आहेत. सुशीर वाद्यांमध्ये सनई, बासरी, क्लेरोनेट, सॅक्सोफोन, माऊथ ऑर्गन, ट्रंपेट, की फ्लूट, बॅगपायपर, सुंद्री, पावरी आणि तत्सम वाद्यांचा समावेश आहे. ही वाद्ये वाजविता येणाऱ्यांना सहभागी होता येणार आहे. ज्या कलाकारांना ह्या व्यतिरिक्त अजून काही वाद्ये वाजविता येत असतील तर त्यांना हि ह्यात सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.
ह्या वर्षीच्या कलादालन मध्ये शनिवारी २० जानेवारीपासून ते २४ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते दुपारी १२ ह्या वेळेत इ.१ली ते इ.४थी च्या विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती, पठण स्पर्धा, चित्रकला तर दुपारी ०२ ते ६ ह्या वेळेत इ.५वी ते इ.१०वी च्या विद्यार्थ्यांसाठी एकपात्री अभिनय, पथनाट्य, वैज्ञानिक संकल्पना प्रकल्प/खेळणी, पोस्टर मेकिंग, वाद्यवादन ह्या स्पर्धा होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या कलाप्रतिभेला प्रोत्साहन मिळावे आणि कला विषयातील त्यांचा आत्मविश्वास वाढावा ह्यासाठी मंगेश विद्या मंदिर माजी विद्यार्थी संघाने ह्या वर्षीच्या कलादालन मध्ये इ.१ली ते इ.४थी च्या विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती कार्यशाळा तर इ.५वी ते इ.१०वी च्या विद्यार्थ्यांसाठी एकपात्री अभिनय, पथनाट्य, वैज्ञानिक संकल्पना प्रकल्प/खेळणी, वाद्यवादन स्पर्धा ह्या वर मार्गदर्शन करणारया कार्यशाळांचे आयोजन केले आहे. सदर कला मार्गदर्शनासाठी शाळेतील कला क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांचे अनुभवी मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच रविवारी २१ जानेवारी ला सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत माजी विद्यार्थ्यांसाठी वाद्यवादन स्पर्धा, माहितीसंपन्न कोलाज पोस्टर (Infographic)आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे. २५ जानेवारीला संध्याकाळी ४ ते ६ ह्या वेळेत वैज्ञानिक संकल्पना प्रकल्प/खेळणी (इ.५वी ते इ.१०वी) आणि माहिती कोलाज (माजी विद्यार्थी) स्पर्धा साहित्य प्रदर्शनासाठी सहभागी व नोंदणी करून घेणार आहेत.
 
२६ जानेवारी-प्रजासत्ताक दिनी, सकाळी ८ ते दुपारी १ ह्यावेळेत झेंडावंदन-कार्यक्रम, कलादालन बक्षीस वितरण आणि कलादालन प्रदर्शन उदघाटन होईल तसेच मान्यवरांच्या हस्ते 'माझी शाळा - सुंदर शाळा' (स्वछता अभियान आणि शाळा रंगकाम उपक्रम) सहभाग निमंत्रणपत्रिका वाटप करण्यात येईल. अधिकाधिक माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी कलादालन महोत्सवात सहभागी व्हावे ह्यासाठी माजी विद्यार्थी संघातर्फे खुले सस्नेह निमंत्रण देण्यात येत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

तुमचे सिम बंद झाले आहे… कॉल आला, OTP सांगितला आणि साडेचार लाख गमावले

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरांना मंजुरी दिली, मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

LIVE: राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments