rashifal-2026

मराठी भाषा घराघरात पोहोचवणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन

Webdunia
गुरूवार, 14 मे 2020 (16:20 IST)
"शुद्धलेखन ठेवा खिशात" या उत्तम अश्या छोट्या पुस्तिकेद्वारे शुद्ध मराठी भाषा घराघरात पोहोचवणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन झाले आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. नाशिक येथे त्यांचे निधन झाले. गेली चार वर्षे ते नाशिकला मुक्कामी होते. शुद्धलेखन हा आग्रह न होता सवय झाली पाहिजे हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं.
 
भाषा या विषयात गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखननियम या चारही विभागांना समान गुणसंख्या असेल तर शुद्धलेखनाचे अध्ययन गांभीर्याने होईल, असे अरुण फडके यांचे मत होते. लेखन नियम आणि व्याकरणाकडे दुर्लक्ष झाले तर ती भाषा संकटात येऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लेखनाच्या नियमांमध्ये एकवाक्यता असणारी भाषाच वेगात प्रगती करू शकते, असा त्यांचा विश्वास होता. अरुण फडके यांच्या जाण्यामुळे मराठी भाषेची मोठी हानी झाली आहे.मराठी भाषेवर अपरिमित प्रेम करणारे गुरुवर्य गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

Ajit Pawar plane crash अजित पवार यांच्या मृत्यूबाबत AAIB चा प्राथमिक अहवाल समोर आला

जळगाव : प्रियकराने घरात घुसून विवाहित प्रेयसीवर गोळी झाडली, नंतर आत्महत्या केली

धोकादायक रसायनांच्या वाहतुकीसाठी एसओपी तयार करणार, महामार्ग सुरक्षा कडक करणार-मुख्यमंत्री

LIVE: मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

इस्रायली हवाई हल्ल्यात प्रचंड कहर, इराणी शाळांमध्ये ५७ निष्पाप मुली ठार

पुढील लेख
Show comments