Festival Posters

Sant Damajipant Information संत दामाजीपंत

Webdunia
मंगळवार, 18 मार्च 2025 (20:17 IST)
Sant Damajipant Information : महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेलेत ज्यांनी भक्तिमार्गाचा मळा फुलवला. समाजाला भक्तिमार्गाचा संदेश दिला. या सर्व संतांपैकी एक संत दामाजीपंत देखील होते. संत दामाजीपंत हे मंगळवेढा येथील महान संत होते. संत दामाजीपंत यांचा कार्यकाळ १३०० ते १३८२ एवढा आहे. ते बिदर येथील मुहम्मद शाहच्या दरबारात सेनापती होते. कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे त्यांची मंगळवेढ्याचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आली होती. तसेच संत दामाजी पंत यांच्या जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. संत दामाजी पंत हे कुशाग्र बुद्धिमत्ता यामुळे खूप प्रसिद्ध होते.  
ALSO READ: संत नामदेव महाराज
शके १३७६ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा त्यांनी अन्नाचे कोठारे बनवले होते. त्यांनी आपले सर्व धान्याचे कोठारे लोकांसाठी खुले करून दिले होते. तसेच सम्राटाने त्यांना अटक करण्यासाठी एक सेना पाठवली होती. व त्यांना बिदर येथे येण्याचा आदेश दिला होता. तसेच संत दामाजी पंतांबद्दल अशी दंतकथा प्रचलित आहे की, प्रवास करीत असतांना साक्षात विठ्ठलाने विठू महाराचे रूप घेतले आणि सम्राटाला सोन्याच्या मोहरा दिल्या आणि पावती घेऊन ती दामाजीपंतांच्या गीतेच्या पोथीत ठेवली. नंतर दामाजीपंतांची सुटका झाली. याकरिता सम्राट ने दामाजीपंत यांना बीदर दरबार बोलावून, त्यांना बंधनमुक्त करून सन्मानित केले, व त्यांना सांगितले की,तुमच्या विठु महार धन पोहचवले. आता मात्र संत दामाजी पंत आश्चर्यचकित होऊन विचारू लागले की, विठु महार कोण जे मला वाचवायला आले होते. आता मात्र त्यांना आश्चर्य वाटले जसे त्यांना समजले विठूमाऊली आली होती तसा त्यांचा पांडुरंगावरचा विश्वास अजून वाढला, त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे आपले उर्वरित जीवन पांडुरंगाची सेवा करण्यात सोपवले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दुष्काळग्रस्त लोकांची सेवा केली यामुळे त्यांचे नाव अमर झाले. 
ALSO READ: संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज संपूर्ण माहिती
संत दामाजीपंत यांचे शके १३८२ मध्ये निधन झाले. तसेच पंतांची समाधी अगदी साध्या रूपात  होती. मग छत्रपतींचा पूत्र राजाराम यांनी  घुमटवजा येथे मंदिर उभारले. व या सुंदर मंदिरात विठ्ठल रुखमाई आणि  दामाजीपंत यांची मूर्ती स्थापन केली. 
ALSO READ: पहिल्या स्त्री-सद्गुरू संत मुक्ताबाई
मंगळवेढा मध्ये भौगोलिक विविधता आढळते.तसेच या ठिकाणी ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच मंगळवेढा तालुका हा ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेश संघ T20 World Cup साठी भारतात येणार नाही

सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना 15 व्यांदा तुरुंगातून सोडण्यात येणार, 40 दिवसांचा पॅरोल मंजूर

गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी ठरलं

आमदार संजय मेश्राम यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, मतदान केंद्रात अडथळा आणल्याचा खटला रद्द

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

पुढील लेख
Show comments