rashifal-2026

शिवराम हरी राजगुरू

वेबदुनिया
` शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असताना ते क्रांतिकारकांच्या संपर्कात आले व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी'चे सदस्य झाले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंह़, यतीनदास यांच्यासोबत त्यांनी पंजाब, कानपूर, आग्रा व लाहोरामध्ये ब्रिटिशाविरुद्ध असंतोष पेटवून जहाल विचारसरणीचा प्रसार केला.

सायमन कमिशनविरुद्ध 30 ऑक्टोबर, 1928 रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमेमुळे 17 नोव्हेंबर, 1928 ला त्यांचे निधन झाले. क्रांतिकारकांनी लजपतरायांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे क्रांतिकारकांनी मोहीम आखली. भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली.

लालजींवर लाठीमार करणारा उपपोलीस अधीक्षक सॅन्डर्स लाहोरामधील आपल्या कार्यालयाच्या बाहेर निघाला असता राजगुरूने त्यांच्यावर गोळी झाडली. तो दिवस होता 17 डिसेंबर, 1928. यानंतर 20 डिसेंबराला लाहोर सोडून तिघेही भूमिगत झाले. राजगुरू 30 डिसेंबर, 1929 मध्ये पुण्यात पकडले गेले. लाहोर कटातील सहभागाबद्दल पुष्कळ क्रांतिकारकांवर खटला चालला. त्यापैकी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांनी लाहोर तुरुंगात 23 मार्च, 1931 रोजी फासावर चढून वीरमरण पत्करले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

मलकापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भंडाराच्या देवरी उड्डाणपुलावरील खड्ड्यांने घेतला आणखी एका तरुणाचा जीव

जशपूरमध्ये एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारची ट्रेलरशी धडक, पाच जणांचा मृत्यू

स्फोट झाला तेव्हा डान्स फ्लोअरवर 100लोक नाचत होते; गोवा नाईटक्लबचा व्हिडिओ समोर आला

दौंडमध्ये 430 कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाला राज्य सरकारकडून मंजुरी

पुढील लेख
Show comments