rashifal-2026

वर्क फ्रॉम होम

Webdunia
गुरूवार, 19 मार्च 2020 (12:46 IST)
वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट किंवा हा शब्द आपण ऐकतो. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तर बर्‍याचदा हा शब्द ऐकावयास  मिळतो. गरोदरपणात स्त्रिया घरुन काम करतात. मूल लहान असतं म्हणून घरुन काम करतात. आता तर कोरोनामुळे सगळे घरुन काम करताहेत..नवराही घरुन काम करतो. मुलीला सुट्टी तीही घरी. मुलाला शाळेला सुट्टी तोही घरी. कामवाली म्हणते, सगळे घरी मग ताई मी पण वर्क फ्रॉम होम करु का?
 
त्यावर ती म्हणाली, मग मीही वर्क फ्रॉम होम करते. यावर सगळेच हसायला लागले. तिला कळेना तिचं काय चुकलं. त्यावर मुलगा म्हणाला, 'आई, तुझं रोजच वर्क फ्रॉम होम असतं.' तिच्या डोळ्यात पाणी आलं. कोणाला काही कळू नये म्हणून ती किचनमध्ये जाऊन मनाशीच बोलू लागली. कोरोना येवो, रविवार असो, बँक हॉलिडे असो की कुठला सण असो की महिला दिन. मी रोजच घरची कामं करते. मला कधी सुट्टी असते का. किती विचार करणसारखी गोष्ट आहे ना ही? आई कुठे काय करते?
 
घरच्या स्त्रीला कायमच गृहीत धरतो ना. कसंबसं सावरत म्हणाली, 'तुम्ही घरी आहात तर दोन दिवस माहेरी जाऊ का?' त्यावर मुलगी म्हणाली, ' मग कुकिंग कोण करणार?' ती म्हणाली, 'तुला शिकवलं की कुकर लावायला. भाजी करायला. पोळ्या घेऊन या बाहेरुन.' त्यावर तिचा पुढचा प्रश्र्न तयार. 'मावशी पण येत नाहीत ग भांडी कोण घासेल माझी नखं तुटतात.' तिची नखं नसतील काहो तुटत. तिला नसेल का नेलपेंट लावावं वाटत. म्हणाली, 'तू कर रे ताईला मदत.' तर बाबा म्हणतो कसा, 'मुलगा आहे तो. त्याला कुठे भांडी घासायला लावतेस.' 
 
तीही म्हणाली, 'ठीक आहे. मी कुठेही जात नाही. कोरोना प्रकरण संपलं की मी नोकरी करेन. मलाही मझ्या पायावर उभं राहायचं.' त्यावर मुलगी म्हणाली, 'आई, तुला का करायचीय नोकरी, आम्ही देतो की पैसे.' त्यावर धीर करुन ती म्हणाली, 'मला पैसे नकोत तर माझा गहाण टाकलेला स्वाभिमान हवा. तो कुठे तुमच्या पैशात येणारे. कोरोनाचे आभार. कारण त्याने माझे डोळे उघडलेत...!'
सोनल गोडबोले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

शिवसेनेच्या नगरसेवकाच्या पतीच्या हत्येप्रकरणी रायगडमध्ये नऊ जणांना अटक

बीएमसी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेमध्ये 227 पैकी 207 जागांवर सहमती

जालन्यात दुर्दैवी अपघात, नदीच्या काठावर भरलेल्या खड्ड्यात 65 वर्षीय महिला आणि 5 वर्षांचा नातवाचा बुडून मृत्यू

LIVE: विकासकामांना मंजुरी देण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाद वाढला

बीएमसी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजनची युतीची घोषणा

पुढील लेख
Show comments