Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागतिक हवामानदिन : भारतीय हवामान विभागाचं कामकाज कसं चालतं?

Webdunia
गुरूवार, 23 मार्च 2023 (20:10 IST)
मानसी देशपांडे
 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.
 
23 मार्च 1950 रोजी परिषदेमध्ये जागतिक हवामान संघटनेची स्थापना करण्यात आली.
 
या निमित्ताने 1951 पासून जागतिक हवामान दिन साजरा करण्यात येतो.
 
भारतासाठी हवामानसंबंधीसाठीची महत्त्वाची संस्था ही भारतीय हवामान विभाग आहे.
 
जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने भारतीय हवामान विभागाचं कामकाज कसं चालतं हे समजून घेऊया.
 
जागतिक हवामान संघटनेबद्दल
जागतिक हवामान संघटना ही एक आंतरसरकारी संस्था आहे ज्याचे जवळपास 193 देश आणि प्रदेश सदस्य आहेत.
 
या संघटनेची मुळे ही आंतरराष्ट्रीय हवामान संघटनेमध्ये सापडतात.
 
23 मार्च 1950 रोजी स्थापना झाल्यावर जागतिक हवामान संघटना ही संयुक्त राष्ट्रांची हवामानशास्त्र, ऑपरेशनल हायड्रोलॉजी आणि संबंधित भूभौतिकीय विज्ञानांसाठी एक विशेष एजन्सी बनली.
 
जिनिव्हा येथे मुख्यालय असलेल्या या सचिवालयाचे नेतृत्व सरचिटणीस करतात.
 
भारतीय हवामान विभागाचा इतिहास
भारतीय हवामान विभागाच्या इतिहासाबद्दल या संस्थेच्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे.
 
त्यावर दिलेल्या माहितीनुसार, हवामानशास्त्राचा भक्कम वैज्ञानिक पाया हा 17 व्या शतकार थर्मामीटर आणि बॅरोमीटरचा शोध लागल्यानंतर आणि वातावरणातील वायुंच्या वर्तनासंदर्भातली अधिक माहिती समोर आल्यावर तयार झाला.
 
इ.स. 1636 मध्ये हॅली या ब्रिटिश शास्त्रज्ञाने भारतीय उन्हाळी मान्सूनव आपला ग्रंथ प्रकाशित केला.
 
याआधी भारतीय प्राचीन ग्रंथ जसे की, उपनिषदांमध्ये हवामानशास्त्राचा आणि सुर्य आणि पाऊस यांच्या परस्परसंबंधांचा उल्लेख आढळतो असंही या वेबसाईटवर म्हटलेलं आहे.
 
भारतामध्ये काही अगदी जुने हवामान निरिक्षण केंद्र आहेत. ही केंद्र भारतीय हवामान विभागाची स्थापना होण्याअगोदरच अस्तित्त्वात आली होती.
 
उदाहरणार्थ, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील हवामान आणि हवामानाचा अभ्यास करण्यासाठी 1785 मध्ये कलकत्ता आणि 1796 मध्ये मद्रास (आताचे चेन्नई) येथे अशी केंद्रं स्थापन केली.
 
1784 मध्ये कलकत्ता येथे आणि 1804 मध्ये मुंबई (आताचे मुंबई) येथे स्थापन झालेल्या एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालने भारतातील हवामानशास्त्रातील वैज्ञानिक अभ्यासाला चालना दिली.
 
कलकत्ता येथील कॅप्टन हॅरी पिडिंग्टन यांनी उष्णकटिबंधीय वादळांशी संबंधित एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये 1835-1855 दरम्यान 40 शोधनिबंध प्रकाशित केले आणि "चक्रीवादळ" हा शब्द तयार केला.
 
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात प्रांतिक सरकारांच्या अधिपत्याखाली अनेक वेधशाळा कार्यरत झाल्या. ही माहिची हवामान विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
 
भारतीय हवामान खात्याची स्थापना
1864 मध्ये कलकत्त्यात विनाशकारी चक्रीवादळ आले. त्यानंतर 1866 आणि 1871 मध्ये मान्सूनचा पाऊस पुरेसा पडला नाही.
 
सन 1875 मध्ये तेव्हा ब्रिटीशांच्या अखत्यारित असलेल्या भारत सरकारने भारतीय हवामान खात्याची स्थापना केली. हे करून देशातील सर्व हवामानविषयक कामे केंद्रीय यंत्रणेच्या अखत्यारीत आणली गेली.
 
एच एफ ब्लॅनफोर्ड यांची भारत सरकारचे हवामान विषयक वार्ताहर म्हणून नेमणूक करण्यात आली. वेधशाळांचे पहिले महासंचालक सर जॉन इलिअट होते.
 
त्यांची मे 1889 मध्ये कलकत्ता इथल्या मुख्यालयात नेमणूक झाली होती. हवामान विभागाचे मुख्यालय नंतर शिमला, नंतर पूना (आताचे पुणे) आणि शेवटी नवी दिल्ली येथे हलविण्यात आले.
 
हवामान विभाग काय काम करते?
हवामानविषयक निरिक्षणे घेणे आणि हवामानाचा ज्या व्यवसायांवर किंवा क्रियांवर परिणाम होतो, (जसे की कृषी क्षेत्र, मासेमारी, हवाई वाहतूक, समुद्रातील तेलाचं उत्खनन)
 
हवामान विभागाचा विस्तार
अशाप्रकारे 1875 साली भारतीय हवामान विभागाची स्थापना झाली. स्थापनेनंतर हवामान विभागाने हवामानविषयक निरीक्षणे, दळणवळण, अंदाज आणि हवामान सेवांसाठी आपल्या पायाभूत सुविधांचा हळूहळू विस्तार केला.
 
हवामान विभागाने समकालीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. टेलिग्राफ युगात, निरीक्षणात्मक माहिती गोळा करण्यासाठी आणि इशारे पाठविण्यासाठी हवामान टेलिग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर झाला.
 
हवामान विभाग हे देशातील अशा काही मोजक्या संस्थांपैकी आहे जिथे संगणकांचा वापर आधी सुरु झाला.
 
देशात आलेल्या पहिल्या काही इलेक्ट्रॉनिक संगणकांपैकी एक संगणक हवामान शास्त्रातील वैज्ञानिक प्रयोगांसाठी आयएमडीला प्रदान करण्यात आला होता.
 
त्यानंतर इन्सॅट सॅटेलाईट भारताकडून तयार करण्यात आला. सतत हवामान निरीक्षण आणि विशेषत: चक्रीवादळांचे इशारे देणे हे इन्सॅटचं प्रमुख काम होतं.
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments