Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता ब्रेड टिकवा दोन महिने

वेबदुनिया
WD
बुरशीजन्य जीवाणूंकडून आंबविलेल्या ब्रेड हा नाशवंत पदार्थ आहे. फार तर तो दोन ते तीन दिवस टिकतो, परंतु हाच ब्रेड दोन ‍महिन्यांपर्यंत जसाच्या तसा आणि अगदी ताजा ठेवणे शक्य होणार आहे. टेक्सास विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन करून एका विशेष धातूचा मायक्रोवेव्ह तयार केला असून, या मायक्रोवेव्हमधून निघणार्‍या किरणांमुळे ब्रेडमधील बुरशीजन्य जिवाणू पूर्णपणे नष्ट झाल्याचा त्यांनी दावा केला आहे. अमेरिकेतील 'मायक्रोझॅप' या कंपनीच्या विनंतीवरून या शास्त्रज्ञांनी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्राचा वापर दुसर्‍या खाद्यपदार्थांसाठी करण्याबाबत संशोधन करण्यात येत असल्याचेही 'मायक्रोझॅप' कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. मायक्रोझॅपचे प्रमुख डॉन स्टल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात खाद्यपदार्थांची नासाडी होते. ही नासाडी रोखण्याबाबत उपाय शोधण्यासठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांपैकी 40 टक्के खाद्यपदार्थ फेकून देण्याकडे अमेरिकी नागरिकांचा कल दिसून येतो. फेकण्यात आलेल्या या खाद्यपदार्थांमुळे दरवर्षी सुमारे 165 कोटी डॉलर वाया जात असल्याचेही सर्वेक्षणात उ घ डकीस आले आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या बचतीसाठी हा शोध महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments