Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुरकुरीत ऑफर्स

Webdunia
सुटीच्या दिवशी भर दुपारी लोक वामकुक्षी घेत असताना हमखास मोबाइलची रिंग वाजते. कोणी ना कोणी, कशाची ना कशाची तरी ऑफर देत राहते.

कॉल रिसिव्ह करताच मंजूळ आवाजात कोणीतरी छानपैकी बोलू लागतं. ‘अभिनंदन सर..!’ हे अभिनंदन कोण कशाकरिता करीत आहे? याचा विचारकरेपर्यंत आपल्याला मस्तपैकी अदबीने सांगितलं जातं, ‘आमच्या कंपनीने सर्व्हे केलेला आहे सर. यात तुमच्या मोबाइल नंबरची निवड झालेली आहे.

तुम्हाला एक प्राईझ मिळालेलं आहे सर.. आज संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला वेळ आहे का सर..? आ एम व्हेरी सॉरी सर.. बट् हे प्राईझ आम्ही तुम्हाला पोहोच करू शकत नाही सर.. आज संध्याकाळी अमुकतमुक थ्री स्टार हॉटेलमधील कॉन्फरन्स हॉलमध्ये एक फंक्शन होणार आहे सर.. तेथे आम्ही प्राईझ देणार आहोत. आपण सहकुटुंब याल का सर..? आपण याल की नाही? हे आत्ताच सांगितलं तर ‘इट विल बी व्हेरी गुड टू अस..’ कारण वेळ खूप कमी आहे सर.. आणि आपले नाव बरोबर आहे ना सर..! सर.. प्लीज आपला पत्ता सांगाल का? बाकी माहिती आपण तेथे आल्यावर तुम्हाला दिली जाईल सर..’ अशा तर्‍हेचा अनुभव पहिल्या वेळी जेव्हा येतो त्यावेळी कमीत कमी एवढे बोलणे आपल्याला ऐकायला मिळते. प्रत्येक वाक्याचा शेवट ‘सर’ या शब्दाने करून लोभस आवाजात बोलणारी व्यक्ती हळूहळू एकेक माहिती गोळा करीत जाते. ‘लोभ ज्याचा सखा असतो’, असे लोक आपले नाव, गाव, पत्ता, इमेल अँड्रेस सगळे काही बिनधास्त सांगतात. मग या जाळत ‘मासा’ मस्तपैकी अडकतो. काहीजण या मृगजळसागरात फेरफटका मारुन परतही येतात. तेथे त्यांना कोणती तरी भेटवस्तू देऊन त्या मोबदलत संबंधित कंपनीच्या मार्केटिंग चेनमध्ये ओढायचा प्रयत्न केला जातो. सध्याच्या युगात असे अनुभव घेणार्‍यांना एका गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की, आपले कोणीही नसताना परिचय नसताना कोणतीतरी माणसे कोणालातरी छोटी-मोठी भेटवस्तू देतात. यामागे कोणतेतरी कारण असलेच पाहिजे. आणि ते हमखास असते.

आळशी माणसाच्या लोभाला असमाधानाचा शाप असतो. काही हुशार आणि चाणाक्ष माणसे याचा फायदा घेत असतात. आपले लक्ष्य गाठण्यासाठी योग्य   भक्ष्य सहजपणे जाळ्यात सापडावे; यासाठी अनेक ऑफर्स दिल्या-घेतल्या जातात. मार्केटिंगचा फंडा व्यवस्थितपणे हाताळला की ऑफर्स हव्या तेथे पोहोचवता येतात. अधूनमधून मोबाइलवर येणारे आदबशीर आवाजातील अनोळखी व्यक्तींचे कॉल्स सतत कोणत्या ना कोणत्या तरी ऑफर्स देत असतात. अनोळखी नंबर रिजेक्ट करणे किंवा टाळणे हे प्रत्येक वेळी व्यवहार्य नसते. अशा तर्‍हेने ऑफर्स कॉल आल्यानंतर अधिक बोलू नये किंवा आपल्या हातात कॉल बंद करण्याचे बटन दिले आहे त्याचा खुशाल वापर करावा. अगदी जिज्ञासा वाटल्यास पलीकडील अदृश्य व्यक्ती कोणत्या उद्देशाने बोलत आहे? त्यातील  सत्ता किती आहे? याची खात्री करूनच बोलावे, अन्यथा फसगत होण्याचीच जास्त शक्यता असते.

एकंदरीत य सगळ्या ऑफर्स कुरकुरीत असतात हे नक्की. ‘एकावर एक फ्री.’ ही तर अगदी जुनी गोष्ट व्हाला लागली. ‘तुम्हाला तुमचं वजन घटवाचं का?

तुम्हाला नोकरी हवी का?’ कधी असे प्रश्न विचारले जातात. तर कधी एखाद्या कोर्सेससाठी हमखास प्लेसमेंटची हमी दिली जाते. ‘एक रुपात होण्डासिटी जिंका. साध्या प्रश्नांची उत्तरे द्या. मारुती स्विफ्ट जिंका.’ कधी असे मजेदार संदेश येतात. एक ना दोन. परंतु या सर्व प्रकारात कोणाच्यातरी फायद्याचा भाग दडलेला असतो. हे ध्यानात घ्यायला हवे. आपल्याला नेमके काय हवे आहे? याचा व्यतीपरत्वे विचार वेगवेगळा असतो. याच एका तत्त्वाचा फायदा उठविणे याचे नाव मार्केटिंग.!! चेन लिंक्ड मार्केटिंगमध्ये लोकांना आकृष्ट करणारी विविध जाळी पद्धतशीरपणे अंथरलेली असतात. या जाळत आपली पावले अडकवून पुन्हा निसटणची धडपड करणपेक्षा, माझा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. प्रामाणिकपणाने आणि कष्टाने मिळेल त्यत मला समाधान आहे. मला कोणतीही फुकटची गोष्ट नको आहे. या संस्कारांवरची निष्ठा जपली; तर कोणत्याही ऑफर्समधून फसगत होण्याचे प्रसंग आपोआप टळू शकतात.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments