Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुलाबी शहराचा इतिहास

Webdunia
ND
गुलाबी नगरी जयपूर राजपूत राजा सवाई जयसिंह (द्वितीय) यांनी वसविले होते. हे शहर वसवितानाच त्यांनी त्याच्या सुरक्षिततेचा खूप विचार केला होता. हे शहर परकीय हल्ल्यापासून सुरक्षित रहावे यासाठी शहराला सात दरवाजे करून बाकीच्या शहराला बुरूजांच्या कोंदणात बसविले होते.

जयसिंहाना चिंता होती, ती विस्तारणार्‍या मराठी साम्राज्याची. म्हणूनच त्यांनी जयपूरला कडेकोट बंदोबस्तात ठेवले होते. पण एवढा विचार करून वसविलेल्या या शहराच्या सुरक्षिततेला कुणी नख लावेल याचा विचारही त्यांनी कधी केला नसेल. देशातील अनेक शहरे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटांनी हादरवली. पण शांत समजणार्‍या जयपूरवर त्यांचा डोळा जाईल, याचा विचारही कधी कुणी केला नसेल.

गेल्या वर्षी ११ ऑक्टोबरला अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्याजवळ बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. १७ जखमी झाले होते.

इतिहासात डोकवायचे झाल्यास जयपूर हे देशातील पहिले सुनियोजित शहर होते. तत्कालीन राजे जयसिंह यांनी त्यावेळची राजधानी आमेरमध्ये वाढत असलेली लोकसंख्या आणि पाण्याच्या प्रश्नाचा विचार करून नवे शहर उभारण्याचे ठरविले होते. त्यानंतर मग १७२७ मध्ये हे शहर बांधायला सुरवात झाली. प्रमुख स्थळे तयार होण्यास चार वर्षे लागली. हे शहर नऊ भागात विभागलेले आहे. दोन भागात राजकीय इमारती व राजवाडे आहेत. शिल्पशास्त्राच्या आधाराने हे शहर वसविण्यासाठी एका बंगाली ब्राह्मणाने मदत केली होती.

पूर्वी हे शहर गुलाबी नव्हते. इतर शहरांसारखेच होते. पण १८५३ मध्ये वेल्सचा राजपुत्र येथे आला तेव्हा संपूर्ण शहराला गुलाबी रंग देण्यात आला. त्यामुळे हे शहर लक्षात राहिले गेले. पुढे जयपूरला गुलाबी शहर हा पर्यायवाची शब्द बनला.

दोनशे वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात हे शहर पसरले आहेत. त्यात जलमहल, जंतर-मंतर, आमेर महल, नाहरगड, हवामहल व आमेरचा किल्ला हे राजपुतांच्या वास्तुशास्त्राचे उत्तम नमुने आहेत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments