Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पालकांचीच जबाबदारी

Webdunia
शुक्रवार, 3 जुलै 2015 (14:10 IST)
आजच्या बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्या पाल्याकडे द्यावे तितके लक्ष देता येेत नाही आणि बाहेरील बिघडलेल्या  परिस्थितीमध्ये मुलावर जे वाईट संस्कार होण्याची भीती उत्पन्न झाली आहे. त्यामुळे भांबावलेला पालक कथामालेसारख्या संस्कार करणार्‍या संस्थेकडे आशेने पाहात असल्यास त्यात फारसे नवल नाही. 
 
प्रथम पालकांची कर्तव्ये काय आहेत, याचा विचार पालकांनी करावयास हवा. खरे तर मुलांवर संस्कार कोण करतो? याचे उत्तर पू. विनोबाजींनी कथामालेच्या कार्यकर्त्यांनाच दिले आहे. ते म्हणतात, ‘बालकावर संस्कार करणारे आपण कोण अलबते गलबते? कोणतीही संस्था हे काम पूर्णत्वाने करू शकत नाही. मुलांवर संस्कार करणारी आईच असते. तीच मुलांवर संस्कार करते आणि मूलही नकळत ते संस्कार उचलीत असते.’
 
सामाजिक परिस्थिती बदलत असली तरीही आपल बाळावर संस्कार होणच दृष्टीने आई-वडिलांनी खबरदारी घेणे आवश्क आहे. सिगारेट ओढणार्‍या आपल्या वडिलांना पाहून छोटय़ा बाळालासुद्धा दोन बोटं तोंडाशी नेण्याचा मोह आवरत नाही. आपले बाबा व आई कसे वागतात, काय करतात यावर लहानग ‘गुप्त’ पोलिसांचे सतत लक्ष असते. बाळाला घरी ठेवून आई-वडील सिनेमा पाहावास जात असल्यास मुलाला एखादेवेळी तरी का इच्छा होणार नाही? आपल्याला घरात ठेवून दर रविवारी आई-बाबा सिनेमाला जातात याचा राग छोटी रेखा आपल्या  लहानशा चित्रकलेतून प्रगट करते. आपले वडील आपलला सिगारेट आणावास सांगतात आणि ‘सिगारेट ओढणे वाईट’ या गोष्टीचा मेळ मुलांच्या मनातच बसू शकत नाही. निष्पाप जीवाला खरे खोटे काहीच समजत नसते. त्याला खोटे बोलायला किंवा आचरण करावायला आई व वडीलच अप्रत्क्ष शिकवत असतात. मुलासमोर आई-वडील भांडू लागले की, त्याचा विपरीत परिणाम मुलांवर झाल्याशिवाय कसा राहील?
 
छोटय़ा बाळाचे घरातील आराध्य दैवत आई-वडील असतात. जगात जे काही ज्ञान आहे ते आपल्या आई-वडिलांच्याच जवळ आहे, अशी त्याची गोड समजूत झालेली असते. या चिमुकल्याने शाळेत पहिले पाऊल टाकले म्हणजे त्याच्या चिमुकल्या जीवनात तिसरी ज्ञानी व्यक्ती प्रवेश करीत असते. ती म्हणजे त्याचे शिक्षक अगर शिक्षिका. या तिघांच्या वरील त्यांच्या निष्ठेच्या भावनेला तडा पडू न देण्याची खबरदारी पालकांनी घ्यावास घ्यावयास हवी. 
 
मुलांच्या संस्कारक्षम वयात जे संस्कार अगर वळण मुलांना मिळते त्याचीच सोबत त्याला जीवनात मिळत असते. आणि ही त्याला  मिळणारी सोबत मुलाला योग्य मार्गावर ठेवण्याच्या दृष्टीने उपयोगी पडते.
 
आई-वडिलांवर अधिक जबाबदारी पडते ती आपल्या मुलाच्या जीवनाचे वळण सुसंस्कृत करण्याची. यासाठी त्यांनी पद्धतशीर प्रयत्न केले पाहिजेत व कष्ट घेतले पाहिजेत. मुलांना वळण लावणारी परिस्थिती बाहेरून उत्पन्न करण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी आई व दायीमधील फरक त्यामध्ये असतोच. आजच्या या सामाजिक परिस्थितीत तर पालकांवरील ही जबाबदारी अधिक वाढली आहे आणि त्याला पालकांनीच तोंड दिले पाहिजे. 
 
उद्याच्या थोर नागरिकांचे जीवन घडविण्याचे कार्य आपल्याला करावयाचे आहे. याची जाणीव आई-वडिलांनी सतत बाळगल्यास त्यांच्या पुढे मुलाच्या संस्काराच्या बाबतीत येणारी समस्या फारशी भेडसावणार नाही. पालकांनी हे लक्षात ठेवावे की, आपल्या बाळाची जडणघडण करण्याचे कार्य प्रामुख्याने त्यांनीच करावयाचे आहे. 
 
उज्ज्वला साळुंके 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments