Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या नवर्‍यांचं करायचं काय?

वेबदुनिया
अलीकडे विद्या बालनचं ‘लेझी लॅड सैय्या’ हे गाणं धमाल गाजतंय. एक विद्याच का म्हणून? सर्व्हे केला तर घरोघरी असे लेझी लॅड गारफिल्ड बोके सापडतील. सुस्त, आळसटलेले. घरकाम सोडाच पण एकूण दुनियेशी काहीएक देणं नसणारे. यांचा सरळ फंडा आहे, डोळे कशाला तर टीव्ही बघायला. पाय कशाला तर पसरायला. हात कशाला तर रिमोट पकडायला आणि क्रिकेटच्या मॅचच्यावेळी टाळ्या वाजवायला, हाताची दहा बोटं का? कॉम्प्युटरचा की-बोर्ड बडवायला, फोनचे नंबर फिरवायला, तोंड कशाला तर गाडी चालवत असताना आडव्या येणार्‍या बायकांना लाखोली मोजायला, पाठ का? टेकायला, पोट का? भरायला, नाक का? घोरायला, मेंदू का? ऑफिसमध्ये घासायला. असो.

एक कामकरी आणि दुसरा सुस्त प्राणी अशा दोन गटात नवरेमंडळी विभागली जातात. त्यातली लेझी लॅड जमात तर बायको जमातीला प्रचंड मनस्ताप देणारी असते. सकाळी अर्ध्या अर्ध्या तासानं वाजणारे गजर अख्ख्या सोसायटीला उठवतात पण नवर्‍याचं घोरणं संपत नाही. अखेर बायकोच्या आवाजातला गजरच त्याचे डोळे उघडतो. त्यानंतरही पेपर, ब्रश इत्यादी करत गडी ब्रेकफास्टपर्यंत येऊन पोहोचला की अचानकच गडबड सुरू होते, मला उशीर झाला (तुझ्याचमुळे) हे ऐकवलं जातं. गाडीच्या किल्ल्या, डबा, रूमाल हे सगळं नजरेच्या टप्प्यात असलं तरी दिसत नाही. घरातून बाहेर पडताना कानाला चिकटलेला फोन आणि संध्याकाळी घरी आल्यावरही घरात शिरता शिरता अमक्या ढमक्या क्लायंटचा फोन घरातल्या, पक्षी-बायकोला, ऐकवण्याची खोड असणारे हे नवरे. असा घरात शिरताना कार्यक्षम असणारा नवरा घरी आल्यावरच सुस्तावून का जातो बरं?

रविवार म्हणजे तर सूर्याला सुट्टी असल्याचा प्रकार. लिव्हिंगरूममधला कोच हातपाय पसरण्यासाठी असतो हे पक्कं असल्यानं अख्खा रविवार कसल्याही मॅचेस, टुकार सिनेमे बघत लोळत घालवणं म्हणजे यांचं अत्युच्च सुख. होम फ्रंटवर म्हणाल तर मुलांचे अभ्यास, त्यांचे प्रोजेक्ट, गृहपाठ, परीक्षा हे तर दूरग्रहावरचे विषय. कोणत्याही शाळेतला कोणताही पालक सभेचा नमून बघा. तिथे मोठय़ा संख्येनं मातृमंडळ दिसेल आणि जे काही तुरळक संख्येत वडील असतील ते नुसतेच श्रवणभक्ती करताना दिसतील. असो. तर लग्न झाल्यावर मुलीची बाई बनते आणि तिचं आयुष्य गुणाकारात विस्तारत जातं. मुलाचा नवरा बनतो म्हणजे खरं तर बाकी शून्य असाच प्रकार. पटलं असेल तर हो म्हणा नसेल तर सोडून द्या, काय?

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments