Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे महादेवा! चमत्कार कर आणि माझे लग्न पवनशी लावून दे...

Webdunia
बुधवार, 30 सप्टेंबर 2015 (15:08 IST)
मध्य प्रदेशातील मंदसौर येथील पशुपतिनाथाच्या मंदिराची दान पेटी उघडल्यावर तिथले पंडितदेखील असेच चकित झाले. या पेट्यांमध्ये फक्त पैसेच नव्हे तर मुलींनी देवाला लिहिले पत्रही सापडले. कोणी आपल्या प्रेम विवाहासाठी तर कोणी आपल्या भावाच्या लग्नासाठी तर कोणी वडिलांचा विश्वास जिंकण्यासाठी पशुपतिनाथाला चिठ्ठी लिहिली होती.
 
मंदिराची पेटी पूर्ण भरल्यावर मंदिर प्रशासनाने ती खोलून त्यातून राशी काढली. पेटी उघडल्याबरोबर त्यातून तीन पत्र सापडले जे मुलींद्वारे लिहिलेले होते. आपल्या भावाच्या लग्नासाठी कैफियत करत एका मुलीने लिहिले होते की हे देवा, काहीही करून माझ्या भावाचं लग्न लवकर लावून दे. त्याचं लग्न होत नसल्यामुळे घरातील सर्व लोकं परेशान आहेत.
 
तसेच दुसरे पत्र एका मुलीने आपले प्रेम मिळविण्यासाठी टाकलेले होते. त्या मुलीने अतिशय नाट्यमय शैलीत हे पत्र लिहिले होते की माझं लग्न पवन नावाच्या मुलाशी लावून द्या. कसे ही करून माझ्या वडिलांचा मन वळवा ज्याने ते राजी खुशी माझं लग्न पवनशी लावून देतील. मानव जन्म एकदाच मिळतो आणि म्हणूनच मी आपले हे जीवन फक्त आणि फक्त पवनसह जगू इच्छित आहे.
 
प्रेम आणि भावासाठी प्रार्थनांसह एका मुलीने आपल्या वडिलांचा विश्वास पुन्हा जिंकण्याची प्रार्थना केली. तिने लिहिले की ती नोकरी करून जबाबदार मुलगी बनू इच्छित आहे. आणि आपल्या वडिलांचा विश्वास पुन्हा मिळवू इच्छित आहे. म्हणून तिची देवाकडून अश्या काही चमत्काराची इच्छा होते की तिला नोकरी मिळावी आणि वडिलांना जुन्या गोष्टीचा विसर पडावा.
 
या पत्रांबाबत मंदिराच्या पुजारी यांचे म्हणणे आहेत की त्यांना दानपेटीतून नेहमी पत्र मिळत असतात. ज्यात भक्त आपली मनोकामना पूर्तीसाठी देवाला मजकूर लिहितात. तरी त्यांना असे पत्र वाचून आश्चर्य वाटतं.
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments