Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपतींचे कुलदैवत श्री तुळजा भवानी

Webdunia
MH GovtMH GOVT
तुळजापुरची भवानी माता ही साडेतीन शक्तीपीठातील दुसरे शक्तीपीठ आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे हे कुलदैवत. भवानी मातेच्या आशीर्वादासाठी महाराजांनी या देवीचे दर्शन घेतल्याचे उल्लेख इतिहासात आहेत. शिवाजी महाराजांना मातेनेच भवानी तलवार दिल्याचे मानण्यात येते.

स्कंद पुराणातही भवानी मंदिराचे उल्लेख सापडतात. याविषयीची एक कथा आहे. कर्दम नावाचा भक्त होता. त्याच्या मृत्युनंतर त्याची पत्नी अनुबुती हिने मंदाकिनी नदीच्या पात्रात पूजा करून भवानी मातेस तिच्या पुत्राची काळजी घेण्याची विनंती केली. कुकूर ह्या राक्षसाने तिच्या आराधनेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भवानी मातेने प्रकट होऊन त्या राक्षसाचा वध केला. या नंतर माता भवानी तुळजा भवानी म्हणून प्रसिद्ध झाली. बालाघाटच्या टेकडीवर हे मंदिर वसले आहे. हेच ठिकाण आज तुळजापूर म्हणून प्रचलित आहे. तुळजा भवानीची मूर्ती स्वयंभू आहे. सिंहासनावर आरूढ मातेस आठ हात आहेत.


तीर्थक्षेत्र तुळजापूर
तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. समुद्रसपाटीपासून 270 मीटर उंचीवर वसलेल्या बालाघाट पर्वतरांगेत हे ठिकाण आहे. तुळजापूर मराठ्यांच्या कार्यकाळात भरभराटीस आले. भोसले राजघराण्याचे हे कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मोहिमेवर निघायचे नाहीत. मंदिर परिसरात सर्वत्र चिंचेची झाडे असल्याने या परिसराचे मूळ नाव चिंचपूर होते. कालांतराने श्री तुळजा भवानी मातेच्या वास्तव्यामुळे त्याचे नाव तुळजापुर झाले. देदेशभरातून दरवर्षी लाखो भाविक येथे भेट देतात.
नवरात्राच्या काळात ह्या क्षेत्रास विशेष धार्मिक महत्व प्राप्त होते.

तुळजापूर नजीक पंढरपूर व अक्कलकोट ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीथेक्षत्रे आहेत. मंदिरात दररोज पहाटे चारच्या सुमारास चौघड्याच्या निनादाने पुजेस प्रारंभ होतो. दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेस चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. शंभू महादेवाच्या सन्मानार्थ याच महिन्यात शिखर-शिंगणापूर येथे जत्राही भरते. पौर्णिमेच्या दुधाळ प्रकाशात येथून परतताना भाविक तुळजापूरला भेट देतात. कर्नाटकातल्या विजापूर येथील शाकंबरी देवीच्या सन्मानार्थ दरवर्षी पौष महिन्यात शाकंबरी नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरात दरवर्षी आश्विन महिन्यात शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात येतो. श्री तुळजा भवानी मंदिर न्यास मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळते. मंदिराच्या आवारातच न्यासाचे कार्यालय आहे. भेट देणार्‍या सर्व भक्तांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था न्यासामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे.

मुख्य मंदिर
मंदिरात प्रवेशासाठी राजा शहाजी व राजमाता जिजाऊ यांच्या नावे दोन द्वारे आहेत. मुख्य दाराच्या पहिल्या माळ्यावर श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय आहे. ग्रंथालयांना लागूनच श्री समर्थ विशेष हे विश्रामगृहही आहे. महाद्वारातून प्रवेश करताना आपणास तुळजा भवानी मंदिर न्यासाचे कार्यालय व राजा शाहू प्रशासकीय सदनाच्या कार्यालयांसोबतच भारतीय स्टेट बँक व उपडाकघरही दृष्टीस पडते. मंदिरात नारळ फोडण्यास मनाई आहे. मंदिराच्या छायाचित्रणाची परवानगी नाही.

पायर्‍या उतरल्यावर उजव्या हातावर गोमुख तीर्थ तर डाव्या हातावर कल्लोळ तीर्थ दृष्टीस पडते. भवानी मातेच्या दर्शनाअगोदर भाविक या पवित्र तीर्थात स्नान करतात. मंदिराच्या आवारातच अमृत कुंड व दुध मंदिर आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या हातावर सिद्धीविनायक मंदिर आहे तर उजव्या बाजूस आदिशक्ती, आदिमाता मातंगीदेवीचे मंदिर आहे. माता अन्नपूर्णेचे मंदिरही येथेच आहे.

मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस मार्कडेय ‍ऋषींचे मंदिर आहे. तसेच पायर्‍या उतरत खाली गेल्यास तुळजा भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या बरोबर समोर यज्ञकुंड आहे.

जाण्याचा मार्ग
सोलापूर व उस्मानाबदहून तुळजापूरला जायला नियमित बस आहेत. सोलापुरहून जवळपास चाळीस किलोमीटरवर तुळजापूर आहे. उस्मानाबादहून येथील अंतर 16 किलोमीटर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास सोलापूर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. विमानाने जायचे असल्यास पुणे किंवा हैदराबाद गाठावे लागेल व तेथून तुळजापुरला यावे लागेल.
सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

Christmas Special Recipe: चॉकलेट केक

कांस्य मसाजमुळे पाय दुखणे दूर होईल, जाणून घ्या त्याचे 6 फायदे

एमबीए कम्युनिकेशन्स मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

गुंतलेले आणि फ्रिज़ी केसांना मऊ करण्यासाठी हे 3 हेअर मास्क वापरा

हे 3 जपानी रहस्य तुम्हाला लठ्ठपणापासून नेहमी दूर ठेवतील

Show comments