Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

10वी उत्तीर्ण महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

Webdunia
मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (08:23 IST)
नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच काही पदांसाठी मिलिटरी हॉस्पिटल किरकी व देहू रोड इथे भरती होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर भरती महिला सफाई कर्मचारी या पदांसाठी असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
महिला सफाई कर्मचारी – एकूण जागा 02
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं असावं.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे.
या पदांसाठी महिला कर्मचाऱ्यांनीच अर्ज दाखल करावेत.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 9,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे.
अशी होणार निवड
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.
 
यानंतर उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. यानंतर काही निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
नोकरीचं ठिकाण
परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे – 411020
परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे – 412201
आवश्यक कागदपत्र
बायोडेटा
दहावीचे शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
अर्ज पाठवण्याचा पत्ता
परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे – 411020 किंवा परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे – 412201

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments