Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपण जाणून घेऊ बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती

Webdunia
बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (13:07 IST)
महाराष्ट्र शासन शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू  मानून अनेक योजना राबवित असते. या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ मिळून देण्यासाठी राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या अभियानाअंतर्गत आज आपण जाणून घेऊ बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती.
 
बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य विषयक सुविधा, आर्थिक सहाय्य, आदी विविध सुविधा देत आहे. या सुविधांमुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान सुसह्य होण्यास मदत होत आहे.
 
१) सामाजिक सुरक्षा-
विवाहाच्या  खर्चाची  प्रतिपूर्ती  रुपये ३० हजार
मध्यान्ह भोजन – कामाच्या  ठिकाणी  दुपारी  पौष्टिक  आहार
प्रधानमंत्री श्रमयोगी  मानधन  योजना
व्यक्तिमत्व विकास  पुस्तक  संचाचे  वाटप
अवजारे खरेदी करिता  ५ हजार  रुपये  मदत
सुरक्षा संच  पुरविणे  अत्यावश्यक  संच  पुरविणे
 
आवश्यक कागदपत्रे –
सर्व योजनांकरिता आवश्यक
अर्जदाराचा फोटो,
आधार कार्ड,
 रेशन कार्ड.
बँक पासबुक  झेरॉक्स
बांधकाम कामगार  नोंदणी  प्रमाणपत्र
 
सामाजिक सुरक्षा योजनेकरिता
शपथपत्रआणि  हमीपत्र  (योजनेनिहाय)
विवाह नोंदणी  प्रमाणपत्र  (विवाह  खर्च  प्रतिपूर्ती  योजना)
 
(२) शैक्षणिक सहाय्य-
या  योजने  अंतर्गत  सर्व  लाभ  फक्त  नोंदणीकृत  बांधकाम  कामगारांच्या  पहिल्या  दोन  मुलांसाठी  लागू आहेत.
 
इयत्ता  पहिली  ते  सातवी  प्रतिवर्ष  रु. २ हजार  ५००  आणि इ. आठवी  ते  दहावी –  प्रतिवर्ष  रु.  ५ हजार.
इयत्ता दहावी  व  बारावीमध्ये  ५०%  पेक्षा  अधिक  गुण  प्राप्त  झाल्यास  रु. १०  हजार.
इयत्ता अकरावी  व  बारावी च्या  शिक्षणासाठी  प्रतिवर्ष  रु. १०  हजार.
पदवी अभ्यासक्रम  शिक्षणासाठी  प्रतिवर्ष  रु.  २० हजार.
MSCIT शिक्षण  मोफत
वैद्यकीय शिक्षणाकरिता  प्रतिवर्ष  रु. १  लाख  व  अभियांत्रिकी  शिक्षणाकरिता – रु. ६० हजार.
शासनमान्य पदविकेसाठी  प्रतिवर्ष  रु. २०  हजार  व  पदव्युत्तर  पदवीसाठी  प्रतिवर्ष  रु. २५  हजार.
शैक्षणिक योजने कागदपत्रे
 
पाल्याचे  शाळेचे  ओळखपत्र
७५% हजेरीचा  शाळेचा  दाखला
किमान ५०%  गुण  मिळाल्याची  गुणपत्रिका.
दहावी व अकरावीची गुणपत्रिका  मागील
शैक्षणिक इयत्तेत  उत्तीर्ण  झाल्याचे  प्रमाणपत्र  (वैद्यकीय, अभियांत्रिकी,  पदवी  व  पदव्युत्तर  अभ्यासक्रमासाठी )
MSCIT उत्तीर्ण झाल्याचे  प्रमाणपत्र
 
३) आरोग्यविषयक –
नैसर्गिकप्रसूतीसाठी रु. १५ हजार व शस्त्रक्रियाद्वारे प्रसूतीसाठी रु.२० हजार.
गंभीर आजाराच्याउपचारार्थ रु.१ लाख.
७५% पेक्षा जास्तअपंगत्व आल्यास रु.२ लाख.
व्यसनमुक्तीकेंद्रातील उपचाराकरिता रु.६ हजार.
 
आरोग्य विषयक योजनेसाठी कागदपत्रे
प्रसूतीचे प्रमाणपत्र (प्रसूती साहाय्य योजना)
गंभीर आजारअसल्याचे प्रमाणपत्र (उपचारार्थ मदत करिता)
७५% अपंगत्वअसल्याचे प्रमाणपत्र (आर्थिक मदत करिता)
व्यसनमुक्तीकेंद्रातून उपचार घेत असल्याचे प्रमाणपत्र
 
 ४) आर्थिक
कामगाराचा  कामावर असताना  मृत्यू  झाल्यास  रु. ५ लाख  (कायदेशीर वारसास मदत).
कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु. २ लाख (कायदेशीर वारसास मदत)
अटल  बांधकाम  कामगार आवास  योजना – रु. २ लाख अर्थसहाय्य
कामगाराचा ५० ते ६० वर्ष  वयोगटात  मृत्यू  झाल्यास  अंत्यविधीसाठी  रु. १०  हजार  मदत
कामगाराचा  मृत्यू झाल्यास  त्याच्या  पत्नीस  अथवा  पतीस  प्रतिवर्ष  रु.  २४ हजार (५ वर्ष मदत)
गंभीर आजाराच्या उपचारार्थ  रु. १ लाख.
 
आर्थिक विषयक योजनेसाठी कागदपत्रे
मृत्यू दाखला व ठेकेदाराचे कामावर असल्याचे प्रमाणपत्र
प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याचे प्रमाणपत्र
 
अर्ज कुठे करावा –
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हा कार्यालयात किंवा https://mahabocw.in/mr/ या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

तेनालीराम कहाणी : कावळे मोजणे

मिक्स व्हेजिटेबल पराठा रेसिपी

World Pancreatic Cancer Day मृत्यूचे सातवे सर्वात सामान्य कारण, आज जागतिक स्वादुपिंडाचा कर्करोग दिवस

मोठी बातमी : Cancer Vaccine कर्करोगाचा सामना करण्यासाठी लस तयार, कोणाला मोफत मिळणार जाणून घ्या

उपवास रेसिपी : बटाट्याची खीर

पुढील लेख
Show comments