Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MPSC च्या 842 पदांसाठी भरती

Webdunia
गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (13:48 IST)
MPSC Bharti 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध शासकीय विभागांतर्गत ८४२ रिक्‍त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासंदर्भात नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्रताधारक उमेदवारांना येत्‍या १२ डिसेंबरपासून नोंदणी करता येणार आहे. अंतिम मुदत १ जानेवारीपर्यंत आहे. 
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांच्‍या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्‍यानुसार एकूण ८४२ पदांवर भरती केली जाणार असून यापैकी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्‍या सर्वाधिक ७७४ जागा आहेत. 
 
उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार या पदांसाठी अर्ज करता येईल. येत्‍या १२ डिसेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज दाखल करता येणार असून पदनिहाय परीक्षांचे स्‍वरूप, अभ्यासक्रम व परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्‍थळावरील जाहिरातीत नमूद केले.
 
जागा- 
* वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये- ७७४
* गृह विभाग- ६
* उच्च व तंत्रशिक्षण विभाग- १
* सामान्‍य प्रशासन विभाग- १
* इतर मागास बहुजन कल्‍याण विभाग- ५७
* पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता विभाग- ३
 
या पदांमध्ये गट ‘अ’, गट ‘ब’मधील पदांचा समावेश असून अर्ज करण्याची पद्धत, प्रवर्गनिहाय तपशील, आवश्यक पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम या बाबतची माहिती https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

आहारात लसणाचा समावेश करा, जाणून घ्या 4 आश्चर्यकारक फायदे

पत्नी दुस-या पुरुषाकडे आकर्षित होत आहे? या 5 मार्गांनी नाते जपा

शौचास गेल्यावर हृदयविकाराची ही सुरुवातीची लक्षणे दिसतात

अनाम वीरा

श्री गणेश आणि हरवलेल्या शंखाची गोष्ट

पुढील लेख
Show comments