Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MPSC Recruitment 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून 7,510 रिक्त पदांवर भरती, तपशील जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (12:21 IST)
MPSC Recruitment 2023: नौकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून 7510 रिक्त पदांवर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या साठी अधिकृत संकेतस्थळावर नोटिफिकेशन जारी  केले आहे. या अंतर्गत 7 हजार 510 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. 
 
दुय्यम निरीक्षक,  तांत्रिक सहाय्यक,  कर सहाय्यक आणि  लिपिक-टंकलेखक आदि पदांसाठी भरती सुरु आहे. 
राज्य उत्पादन शुल्क गृह विभागात दुय्यम निरीक्षक पदासाठी भरती सुरु आहे. या पदासाठी वेतनमान 32 हजार ते 1 लाख 1 हजार 600 रुपये आहे. तर पात्रता पदवीधर असावे. 
तांत्रिक सहाय्य्क पदासाठी पात्रता पदवीधर असून वेतनमान उमेदवारांना दरमहा 29,200 ते 92,300 रुपये वेतनमान असेल. 
 
कर सहाय्यकच्या 468 रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला  मराठी टंकलेखन साठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रतिमिनिट असून उमेदवार शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. या पदासाठी वेतनमान दरमहा 25,500 रुपये ते 81,100 रुपये वेतनमान दिले जाणार.
 
लिपिक-टंकलेखक पदासाठी उमेदवार ने पदवीधर असावे तसेच मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रतिमिनिट असावा. या पदासाठीच्या उमेदवारांना 19,200 ते 63, 200  रुपये वेतनमान दिले जाईल. 
या साठी उमेदवारांचे वय 1 मे 2023 रोजी 18-38 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात येईल. 
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 17 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार असून उमेदवार  31 ऑक्टोबर  2023 पर्यंत अर्ज करु शकतात. 17 डिसेंबर रोजी या पदांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. 
 










Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

पुढील लेख
Show comments