Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले

Webdunia
बुधवार, 27 जुलै 2022 (08:20 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार रिक्त पदांसाठी अधिकृत वेबसाईट mpsconline.gov.in वर 17 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करु शकतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये, गट ब मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या 427 जागांसाठी MPSC भरती मोहीम राबविण्यात येत आहे. जाहिरात क्रमांक 70/ 2022 अंतर्गत पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. उमेदवार mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवरही भरतीसंदर्भातील अधिसुचना पाहू शकतात.
 
MPSC वैद्यकीय अधिकारी पदासाठीच्या अटी
वयोमर्यादा
1 ऑक्टोबर 2022 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच राखीव प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादा शिथिल आहे.
 
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी असणे आवश्यक.
अर्ज फी
 
अर्जासाठी अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क रुपये 394 आणि आरक्षित श्रेणीसाठी 294 रुपये ऑनलाइन शुल्क भरावे लागेल.
 
MPSC Medical Officer पदासाठी अर्ज करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
१) सर्वप्रथम उमेदवारांनी mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
 
२) होम पेज ‘User Registration’ वर जा आणि तुमचे प्रोफाइल तयार करा.
 
३) तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि इच्छित पोस्टसाठी अर्ज करा.
 
४) आता तुमचा अर्ज भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
 
५) अर्ज सबमिट करा आणि एक प्रत डाउनलोड करा.
 
६) भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या.
 
MPSC वैद्यकीय अधिकारी निवड प्रक्रिया
भरती अंतर्गत निवड होण्यासाठी MPSC वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करेल. खूप जास्त अर्ज प्राप्त झाल्यास आयोग उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी स्क्रीनिंग चाचणी घेऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

औषधांशिवाय आरोग्याची काळजी घ्या, हे 10 सोपे घरगुती उपाय करा

ब्युटी सिक्रेट्स: या सोप्या पद्धतीने काही मिनिटांत घरच्या घरी चमकणारी त्वचा मिळवा

महिलांनी स्तनपान करताना ब्रा घालणे योग्य आहे की नाही?जाणून घ्या

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

पुढील लेख
Show comments