NLC Recruitment 2020: जर आपण नोकरीच्या शोधात आहात, तर आपल्याला एनएलसी इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी आहे. प्रत्यक्षात येथे 500 हून अधिक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक येत्या 15 ऑक्टोबर रोजी कार्यान्वित होणार आहे. या नंतर आपण आपल्या पात्रतेनुसार नोकरीसाठी अर्ज करू शकता.
एनएलसी इंडिया लिमिटेडने 550 पदांवर नोकऱ्या काढल्या आहे. या साठी आपण ऑन लाईन अर्ज अधिकृत संकेतस्थळावर nlcindia.com करू शकता. सध्या या नोकरीसाठीच्या अधिसूचना जारी केल्या आहेत.
अर्ज करण्यासाठीची लिंक 15 ऑक्टोबर पासून कार्याविन्त होणार असून उमेदवार 10 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.
NLC ने ग्रॅज्युएट्स अॅप्रेंटिस आणि टेक्निकल अॅप्रेंटिस या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या नोकऱ्यां बद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत सूचना एकदा तरी वाचावी.
अर्ज केल्यावर शॉर्टलिस्ट उमेदवारांची घोषणा 16 नोव्हेंबरला होणार. या नंतर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाईल. जे 23 नोव्हेंबर पर्यंत असणार. या पदांवर निवड झालेल्या पदवीधर अॅप्रेंटिस ला 15 हजार रुपये महिना आणि टेक्निकल अॅप्रेंटिस याना 12 हजार रुपये वेतन मिळणार आहे.