Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

RBI मध्ये नोकरीची संधी, 450 जागांवर होणार भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

Webdunia
गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (11:26 IST)
RBI Assistant 2023 नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 450 सहाय्यक पदांची भरती करणार आहे. बँकेच्या www.rbi.org या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे. प्राथमिक परीक्षा 21 ते 23 ऑक्टोबर 2023 दरम्यान, तर मुख्य परीक्षा 2 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.
 
आरबीआय सहाय्यक पदांसाठी पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात 50 टक्के गुणांसह पदवीधर असणे अनिवार्य आहे. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे.
 
RBI सहाय्यक पदांसाठी वयोमर्यादा
किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे. उमेदवाराचा जन्म 2 सप्टेंबर 1995 पूर्वी आणि 1 सप्टेंबर 2003 नंतर झालेला नसावा. ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत मिळेल.
 
आरबीआय सहाय्यक वेतनमान
निवडलेल्या उमेदवाराचे प्रारंभिक मूळ वेतन 20,700 रुपये असेल. वेतनश्रेणीनुसार यात वाढ होणार आहे. याशिवाय महागाई, प्रवास आदी भत्तेही मिळतील.
 
RBI सहाय्यक पदासाठी अर्ज शुल्क
सामान्य, OBC आणि EWS- 450 रु
SC, ST आणि दिव्यांग - 50 रु
 
आरबीआय सहाय्यक पदासाठी अर्ज शुल्क निवड प्रक्रिया
उमेदवारांना तीन परीक्षा द्याव्या लागतील. यामध्ये प्राथमिक, मुख्य आणि भाषा प्रवीणता चाचण्यांचा समावेश आहे.
 
RBI सहाय्यक पदासाठी निवड प्रक्रिया
प्राथमिक परीक्षा 1 तासाची असेल. ज्यामध्ये 100 गुणांचे 100 प्रश्न असतील. यामध्ये इंग्रजीचे 30, गणितीय क्षमतेचे 35 आणि तार्किक क्षमतेचे 35 प्रश्न विचारले जातील. मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 200 प्रश्न विचारले जातील. परीक्षा सोडवण्यासाठी उमेदवारांना 135 मिनिटे दिली जातील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

राजा-राणी कहाणी : राजाची प्रेमकथा

चिकन फ्राईड राइस रेसिपी

झटपट बनणारे मटार समोसे रेसिपी

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments