Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात बेरोजगार झालेल्यांना मिळणार रोजगाराची संधी ! पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने घेतला पुढाकर, जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (21:50 IST)
कोरोनाच्या पहिल्या व दुसरर्‍या लाटेचा अनेकांना रोजगार गमवावा लागला. तर काहींना कोरोनाला घाबरून पुणे सोडले. यामुळे शहरातील अनेक क्षेत्रात संध्या कुशल आणि अकुशल कामागारांची कमतरात निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने (Pune District Legal Services Authority) पुढाकर घेतला आहे.
 
‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण’  ‘सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे’ (Symbiosis Law School, Pune), ‘डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट’ (divine jain group trust) आणि ‘ललिता मोतीलाल सांकला फाउंडेशन (lalita motilal sankala foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यात औद्योगिक, बांधकाम, हाऊसकिपींग आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठी त्यात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय ए. देशमुख ( Chief District and Sessions Judge Sanjay A. Deshmukh) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
 
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत (District Legal Services Authority Secretary Pratap Sawant) , सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या संचालिका डॉ. शशिकला गुरपूर (The director of Symbiosis Law College, Dr. Shashikala Gurpur), ललिता मोतीलाल सांकला फाउंडेशनचे अध्यक्ष सनी सांकला (Sunny Sankla, President of Lalita Motilal Sankla Foundation) आणि डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा (Sanket Shah, Chairman, Divine Jain Group Trust) यावेळी उपस्थित होते.
 
कामगारांनी न्यायालयात अर्ज केल्यानंतर त्यांची तटताळणी केली जाईल.त्यानंतर कामगारांचे अर्ज संबंधित कंपन्यांना पाठविण्यात येणार आहे.
अर्जदाराला कोणत्या कामात रस आणि माहिती आहे, त्यानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.नऊ सप्टेंबरपर्यंत  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पहिला मजला, नवीन इमारत, जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर (Shivajinagar Court)आणि pratapswa@gmail.com येथे अर्ज करावेत, असे सचीव सावंत यांनी सांगितले.
 
मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध :
 
चाकणसह (Chakan) परिसरात सध्या नवीन उद्योग सुरू होत आहेत.तर सध्या सुरु असलेल्या उद्योगांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे उत्पादन कमी झाले आहे.या आद्योगिक वसाहतीमध्ये मोठा प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे.त्याचा गरजुंनी लाभ घ्यायला हवा, असे शहा आणि सांकला यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

तुमच्या केसांमध्ये सलूनसारखा ओलावा हवा आहे? या घरगुती उपायाचा अवलंब करा

हिवाळ्यात मुळ्याच्या पानांची चटणी खाण्याचे फायदे जाणून घ्या

आपल्या जोडीदाराला कसे प्रभावित करावे जेणेकरून नातेसंबंध मजबूत राहतील, जाणून घ्या

विमानात शौचालयातील मलमूत्र कुठे जातं? तुम्हाला माहीत आहे का?

Winter Fruits हिवाळ्यात ही फळे शरीराला हायड्रेट ठेवू शकतात

पुढील लेख
Show comments