rashifal-2026

UPSC CAPF Recruitment 2023 : UPSCमध्ये नोकरीची संधी

Webdunia
मंगळवार, 2 मे 2023 (15:32 IST)
UPSC CAPF Recruitment 2023: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा CAPF 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे 300 हून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. 26 एप्रिल 2023 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
 
UPSC CAPF भर्ती 2023 च्या अधिसूचनेनुसार, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2023 आहे. अर्ज दुरुस्तीची संधी 17 ते 23 मे 2023 पर्यंत असेल तर UPSC CAPF भरती परीक्षा 06 ऑगस्ट 2023 रोजी होईल.
 
UPSC CAPFs Vacancy 2023: येथे रिक्त पदांचे तपशील पहा
BSF: 86 पदे
CRPF: 55 पदे
CISF: 91 पदे
ITBP: 60 पदे
SSB: 30 पदे
 
एकूण रिक्त पदांची संख्या - 322 पदे
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावे. तथापि, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल अधिक माहिती अधिसूचनेत पाहिली जाऊ शकते.
 
अर्ज फी
उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल. SC/ST/महिला उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत रोखीने किंवा कोणत्याही व्हिसा/मास्टर/रुपे क्रेडिट/डेबिट कार्ड/यूपीआय वापरून किंवा कोणत्याही बँकेचे नेट बँकिंग वापरून पैसे जमा करून शुल्क भरू शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

उकळता चहा किंवा कॉफी पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

हिवाळ्यात कोरडी त्वचा आणि कोंडा दूर करण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय अवलंबवा

खोलीत रूम हीटरसोबत पाण्याची बादली ठेवणे का महत्त्वाचे आहे?

दहावी बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी?

लिपस्टिक लावताना या चुका करू नका

पुढील लेख
Show comments