Marathi Biodata Maker

चेहर्‍यानुसार निवडा इयररिंग्‍स

Webdunia
सध्या वेगवेगळ्या इरयरिंग्सची फॅशन आहे तरी प्रत्येक शेप आणि साइजचे कानातले प्रत्येकावर उठून दिसत नाही. म्हणून आवश्यक आहे जाणून घेणे की आपल्या चेहर्‍याच्या आकाराप्रमाणे आपल्यावर कसे कानातले शोभून दिसतील.



राउंड
गोल चेहर्‍याला लांबी प्रदान करण्यासाठी लांब आणि पातळ कानातले घालायला हवे. झुमके आणि स्टड्स आपल्या चेहर्‍यावर सूट करणार नाही. म्हणून ड्राप रिंग्स किंवा जरा वळलेले रिंग्सही छान दिसतील. 

स्क्वेअर
चेहरा स्क्वेअर असल्यास आपल्याला चेहर्‍याला सौम्यता प्रदान करण्याचा प्रयत्न करायला हवा.  रुंद कानातले निवडण्यापेक्षा लांब कानातले आपल्यावर जास्त सूट करतील. स्क्वेअर आकाराचा दागिणा टाळा. लोंबत असलेले झुमके किंवा ड्राप निवडा. स्क्वेअरसोडून एखादा वेगळा आकार ट्राय करून पाहू शकता. 

रेक्टेंगल
आयताकृती चेहर्‍यावरही स्टड्स किंवा कानाला चिटकून असणारे झुमके छान दिसतील. टिपीकल स्टडऐवजी मार्डन, चंकी फंकी स्टड निवडा. बटनस्टाइल किंवा गोल कानातलेही आपल्यावर उठून दिसतील. 

हार्टशेप
हृदयाकार चेहर्‍यासाठी झुमके सर्वात उत्तम पर्याय आहे. वरून पातळ आणि खालून रुंदीला अधिक झुमके छान दिसतील. अवतरण त्रिकोण आणि टॉप्स हेही आपल्या चेहर्‍यासाठी पर्फेक्ट आहे.

ओव्हल
ओव्हल चेहर्‍याचा शेप सर्वोत्तम आहे. असा शेप असणार्‍या स्त्रिया लकी असतात. त्यांच्या चेहर्‍यावर प्रत्येक शेप, साइज सूट करतं. स्टड, ड्राप, झुमके, चाँदबाली असो वा टॉप्स, यांना जे आवडेल ते घालण्याची विचार करण्याची मुळीच गरज नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अस्सल मराठमोळी फोडणीची खिचडी आणि कढी पाककृती

दररोज ब्रेकफास्ट करत नाही, नाश्ता वगळण्याचे परिणाम जाणून घ्या

कच्च्या दुधाच्या या सोप्या वापराने बटरसारखी मऊ त्वचा मिळवा

रिकाम्या पोटी ग्रीन टी सेवन करण्यापूर्वी, त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

नात्यात ही 7 चिन्हे दिसली तर सावधगिरी बाळगा

पुढील लेख
Show comments