Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरामदायक 'ट्रेंडी' पॅन्ट

Webdunia
पॅन्टसोबत साधारण कॉटन शर्ट असो किंवा सिल्क व जॉर्जेटचे शर्ट अगदी सर्व मॅच करतात. एखाद्या डिनर पार्टीत एक शानदार स्कॉर्फ किंवा शालसुद्धा पॅन्ट-शर्ट सोबत छान दिसतो.      
फॅशनच्या जगात महिलांसाठी पॅंटचे पुनरागमन झाले आहे. पॅरिस फॅशन शो असो की लक्मे फॅशन वीक सगळीकडे पॅन्टस् परिधान केलेल्या मॉडेल दिसू लागल्या आहेत. एवढंच नव्हे तर फॉर्मलशिवाय याचा उपयोग कॅजुअल्समध्ये देखील होताना दिसत आहे.

सध्या कॉर्पोरेट कल्चरमुळे कपडे घालण्याच्या पद्धतीत कमालीचा बदल जाणावत आहे. मुली फॅशनसोबतच आरामालाही महत्त्व देत आहेत. म्हणूनच जीन्स-ट्राउजरसारखे कपडे मुलींची पहिली पसंत झाली आहे. पिकनिक, आउटिंग किंवा विकेंडला जीन्स परिधान करताना दिसत आहेत. पण मीटिंग, कॉंन्फरन्स, ऑफिशियल पार्टी किंवा सेमिनारच्या वातावरणात हे फिट बसत नाही. म्हणूनच मुलींनी आता पॅन्ट-ट्राउजरला प्रमुख पोशाखांमध्ये सहभागी केले आहे. त्यातही विविध प्रकार आहेत.- ट्राउजर, सिक्स पॉकेट, कार्गो, बूट कट आदी.

ND
तुम्ही ऑफिस व्यतिरिक्त टी पार्टी किंवा डिनर पार्टीत सिल्क शर्टासोबत पॅन्ट परिधान करू शकता. पॅन्ट आरामदायक असल्यामुळे हल्ली मोठ्या इंन्स्टिट्यूटनी शर्ट-पॅन्ट हा युनिफॉर्म म्हणून स्वीकारला आहे. एअरलाइन्स, हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त काही बँका आणि कॉलेजमध्ये आता मुली युनिफॉर्म म्हणून पॅन्ट शर्ट परिधान करायला लागल्या आहेत. त्याने स्मार्टनेस वाढतोच, आणि धावपळीची कामे सोपी होतात. पॅन्टसोबत साधारण कॉटन शर्ट असो किंवा सिल्क व जॉर्जेटचे शर्ट अगदी सर्व मॅच करतात. एखाद्या डिनर पार्टीत एक शानदार स्कॉर्फ किंव ा श ालसुद्धा पॅन्ट-शर्ट सोबत छान दिसतो. तसेच त्यावर बीडसची माळ, डायमंड नेकलेस किंवा लॅदर नेकपीस, ब्रेसलेट, लॅदर बेल्ट, कॉर्पोरेट बॅग्सपासून कल्च आणि पर्स हेही मॅच होते. पॅन्ट परिधान केल्यास लेदर शूज, सँडल, ट्रेंडी चप्पलसुद्धा परिधान शकता. त्याचबरोबर आपण पिकनिक आणि खेळण्यासाठी कार्गो किंवा सिंपल बूट कट देखील वापरू शकता.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

Show comments