Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थंडीत त्वचा सांभाळा!

Webdunia
हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे तिची योग्य ती काळजी घेणे जरूरीचे असते. ही काळजी कशी घ्यावी याची ही माहिती.

सफाई :-
NDND
त्वचेच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळे साबण बाजारात उपलब्ध आहेत. थंडीत जास्त तेल असणारे ( टीएफए म) चांगल्या प्रतीचे साबण वापरावेत. टीएफएम जेवढा जास्त तेवढे साबणातले Oily Ingredent जास्त साबणात वापरलेली चरबी ही प्राणीज किंवा वनस्पतीज चरबी जवळजवळ सारख्याच प्रमाणात त्वचेला तेलकटपणा ( मृदुता) देते. पण प्राणीज चरबी ( Fat) वापरल्याने काही जणांना एलर्जी होऊ शकते. म्हणून एलर्जीक असणार्‍यांनी प्राणीज चरबीपासून बनवलेले साबण, क्रीम किंवा बॉडीलोशन वापरू नये.

खाद्यपदार्थांवर लाल किंवा हिरवा रंगाचा मार्क त्यातील वनस्पतीज किंवा प्राणीज अंशाची माहिती देतो. पण बाह्य उपयोगाच्या वस्तुंवर (साबण, क्रीम, पावडर, बॉडी लोशन) असे निशाण असत नाही म्हणून आपल्या आवडीनुसार व शरीर प्रकृतीनुसार योग्य उत्पादनाची निवड पूर्ण लेबल वाचून किंवा बघूनच करावी.

थंडीत आंघोळीचे पाणी जास्त गरम असू नये. अन्यथा अंघोळीनंतर त्वचा जास्तच कोरडी होते. कारण जास्त गरम पाण्याने त्वचेवरचे पातळ तेलाचे आवरण निघून जाते त्यामुळे त्वचा ओलावा गमावते.

NDND
तेल/बॉडी लोशन :-
थंडीत आंघोळीनंतर शरीर खसखसून न पुसता हळूच टिपावे. तेलाच्या हाताने हलकी मॉलिश करावी. त्यानंतर लगेच त्यावर पाणी टाकून किंवा पुसू नये, नाहीतर जे पाणी त्वचेत सामावले आहे ते उडून पुन्हा त्वचा कोरडी होईल.

सर्वसाधारणपणे खोबरेल तेलच लावावे. थंडीत ते घट्ट होत असल्याने काही लोक मोहरीचे (सरसो) तेल लावतात. सामान्य त्वचेसाठी ते ठिक आहे पण एलर्जीक व जास्त कोरडी त्वचा असणार्‍या लोकांना त्यामुळे जास्तच त्रास होतो.

या दोन तेलांखेरीज गोडं तेल (याबीन, सनफ्लॉवर, करडई, किंवा ऑलिव्ह ऑईल) पण वापरता येते. तेलाशि‍वाय, पाणी व ग्लिसरीन समप्रमाणात एकत्र करून ते आंघोळीनंतर लावल्यासही अपेक्षित परिणाम लक्षात येतो.

कपडे :
लोकरीचे किंवा गरम कपडे शरीराच्या वर लगेच न घालता प्रथम मऊ, सुती कपडे परिधान करून मगच त्यावर हवे तसे गरम कपडे चढवावेत.

रोग : थंडीत त्वचारोगांचे प्रमाण वाढते. तारुण्यपिटीकांचे प्रमाणही वाढते. तारुण्य पिटी‍कांसाठी वापरल्या जाणार्‍या औषधांमुळे त्वचा आणखीनच कोरडी होते. म्हणून त्वचेचा कोरडेपणा दूर करणारी क्रीम त्वचा नरम करून ओलावा तर आणते पण त्यामुळे चेहर्‍यावरचे फोड ( तारूण्यपिटीक ा) वाहू लागतात त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच क्रीम वापराव्यात.

WDWD
लहान मुलांमध्ये आढळणारा Atopic Exzima थंडीत जास्तच सक्रीय होतो. यात त्वचा खूपच कोरडी होते. त्याच्या त्रासामुळे मुलांबरोबरच पूर्ण कुटुंब हैराण होते. यात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराची सफाई कशी करवी, त्यानंतर कोणते क्रीम किती प्रमाणात लावावे तसेच मुलांना कसे कपडे घालावेत हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यानीच करावे. वैद्य हकीम तसेच बाजारू औषधांचा प्रतिकूल परिणाम होणे स्वाभाविकच आहे. याप्रमाणे हायपोथॉयरॉईड रोगाने ग्रस्त बायका व 40 पेक्षा जास्त वय असणार्‍या व्यक्ती ज्यांची त्वचा वरचेवर कोरडी होत आहे त्यांनी थंडीत ( दिवाळी ते होळ ी) आपली त्वचा योग्य पद्धतीने साफ करून, आंघोळीनंतर योग्य प्रमाणात योग्य क्रीम लावावे.

फुटणारे ओठ :-
NDND
फुटलेल्या ओठांवर कधीही जीभ फिरवू नये कारण थुंकीत असणारे Enzymes त्रास वाढवतात व आपल्या ओठाजवळची त्वचा काळवंते. तसेच पाणी प्यायल्यावर लगेच ओल्या ओठांवर तूप लावावे याशिवाय योग्य व्यायाम, भरपूर पाणी, योग्य खाद्यतेलाचा जेवणात वापर तसेच Heater चा अतिरेक टाळल्यास दिवाळीपासून होळीपर्यंतचा हा काळही आनंदात व उत्साहात जाईल.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments