३) फाऊण्डेशन घेताना ते तुमच्या त्वचेच्या रंगाजवळ जाणारं असेल असंच निवडावे. फाऊण्डेशनचे अनेकविध प्रकार उपलब्ध आहेत.
४) तुमची त्वचा सामान्य प्रकारातली असेल, तर तुम्ही जेल स्वरुपातील फाऊण्डेशन निवडणं योग्य ठरते. कोरड्या त्वचेसाठी क्रीम स्वरुपातील फाऊण्डेशन निवडावे. हे ऑइल बेस्ड असल्याने तुमच्या त्वचेला यातून मॉइश्चरायझर मिळतं. तर तेलकट त्वचा असणा-यांनी स्टिक फाऊण्डेशन घ्यायला हवं. कारण लावल्यानंतर हे फाऊण्डेशन लगेच सुकून जातं. लिक्विड फाऊण्डेशन सगळ्याच प्रकारच्या त्वचेला सूट होतं. चेह-याला एक लाइट शेड यामुळे मिळते खरी पण, तुमच्या चेह-यावर काही डाग वगैरे असतील तर ते लपले जात नाहीत.
५) डोळ्यांखालची डार्क सर्कल्स लपवण्यासाठी फाऊण्डेशनऐवजी कन्सिलर वापरा. फाऊण्डेशनच्या शेडचंच कन्सिलर घ्या. चेह-यावरील पिंपल्स, डाग यामुळे लपवणं शक्य होतं.
६) फाऊण्डेशन लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा आणि मऊ सुती कापडाने पुसून घ्यावा. खरखरीत कापडाने चेहरा कधीच पुसू नये. चेह-याची त्वचा अतिशय नाजूक असल्याने चेह-याला ईजा होऊ शकते. चेहरा आणि मानेवर बर्फ चोळा. कापसाच्या बोळ्यावर फाऊण्डेशन घेऊन कपाळ, गाल, नाक आणि हनुवटीवर थेंब थेंब लावावे. ब्रश किंवा शक्यतोवर बोटांचा आणि तळव्याचा वापर करून चेह-यावर नीट पसरून लावावे.
७) स्टिकचा वापर करताना ते चेह-यावर थेट लावा आणि पाण्याचे थेंब घेऊन चेहऱ्यावर नीट पसरवा. फाऊण्डेशनचा बेस तयार झालेल्या चेह-यावर आता तुम्ही छान मेकअप करू शकता. व्यवस्थित फाऊण्डेशन लावलेले असेल तरच मेकअप नीट बसतो आणि सौंदर्य आणखी खुलून दिसते.