Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेकअप इज अ आर्ट

वेबदुनिया
मेकअपकडे एक कला म्हणून बघितले जाते. काही महिला ऑफिसला जातानाही हलकासा मेकअप करणे पसंत करतात. काही वेळा ही व्यवसायाची अथवा कामाची गरज असते. प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये जाऊन मेकअप करवून घेणे शक्य नसते. त्यामुळे मेकअपची काही सोपी तंत्रे शिकून घेतल्यास सोयीये जाते.

फाउंडेशनचा विचार करता यात तीन प्रकार आढळतात. लिक्वीड, क्रिम आणि पावडर. फाउंडेशनच्या वापरासाठी मऊ स्पंजचा वापर करावा. चेहर्‍यावर फाउंडेशन लावून घेऊन हलक्या हाताने स्पंज फिरवावा. चेहर्‍याप्रमाणेच मानेवरही फाउंडेशन लावावे. फाउंडेशनला मेकअपचा बेस मानले जाते. त्याने चेहर्‍यावरील छोटे डाग, खड्डे, काही वर्तुळे झाकली जातात. त्यामुळे फाउंडेशन एकसारखे पसरणे महत्त्वाचे आहे. अन्यथा त्याचे लेअर्स स्पष्ट दिसून येतात आणि मेकअप पॅची दिसतो. त्वचेचा पोत लक्षात घेऊन फाउंडेशनचा प्रकार निवडावा. मेकअप करताना डोळ्याकडे सर्वात जास्त लक्ष द्यावे. प्रथमदर्शनी डोळ्यांकडेच लक्ष जाते. त्यामुळे येथील छोटीशी चूकही सगळा मेकअप बिघडवून टाकते. डोळ्याच्या मेकअपसाठी शक्यतो वॉटरप्रुफ लाँग ‍लास्टिंग मेकअप साहित्य वापरावे. मेकअपची सरुवात आय शॅडो लावून करावी. त्यानंतर आय लायनर लावावा. पापण्यांवर हलक्या प्रमाणात ब्राँझ शड वापरल्यास डोळे अधिक उठावदार दिसतात. त्यानंतर मस्करा वापरावा. प्रथम वरच्या आणि नंतर खालच्या पापणीला मस्करा लावावा. गालावर मेकअपचा हात फिरवताना तोच रंग जबड्यापशी आणि गालाच्या कडांवर लावावा. यासाठी वार्म ब्रश वापरणे चांगले. डार्क ब्रशने त्वचा कोरडी होण्याचा धोका असतो. नेहमी ब्राइट आणि ग्लासी कलर वापरावेत. यामुळे मेकओव्हरचा आनंद मिळवता येतो. मेकअप करण्याएवढेच लक्ष मेकअप उतरवण्याकडे द्यावे. न कंटाळता मेकअप धुणे आणि त्वचेवर ओलावा देणारे क्रिम लावणे महत्त्वाचे आहे. मेकअप अधिक काळ त्वचेवर राहिल्यास त्याचे काही साइड इफेक्ट्स भोगावे लागतात हे लक्षात ठेवावे.

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

Vaginal Ring अवांछित गर्भधारणेपासून टाळण्यासाठी वेजाइनल रिंग !

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

Show comments