Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लखनवी चिकन

श्रद्धा बेलसरे-खारकर

Webdunia
MHNEWS
लखनवी चिकन हे पांढर्‍या शुभ्र किंवा प्लेन विविध रंगी साडीवर हाताने टाके मारुन डिझाईन केलेले कापड. यात कॉटन कपड्यासोबतच कलाकुसरीला देखील तेवढेच महत्त्व असते. म्हणूनच असे कापड महाग असते. लखनवी चिकन केलेले ड्रेस विशेषत: उन्हाळ्यात अथवा समारंभात घालण्याची प्रथा आहे. यातून व्यक्तिमत्व उजळून दिसते तर लखनवी चिकन कापडात असलेल्या 'रिच लूक'मुळे एक वेगळी इमेज तयार होते. पांढर्‍या शुभ्र पंजाबी ड्रेसवर गळ्यात मोत्याची माळ आणि नाजुकसे मोत्याचे कानातले हा टिपिकल पार्टीवेअर ड्रेस केवळ लखनवी चिकनमुळे उठून दिसतो.

ND
विशेषत: कुर्ते, पायजमा, शर्ट, बंडी यावर विशिष्ट प्रकारच्या धाग्यांचा वापर करुन केलेली डिझाईन मोठ्या प्रमाणावर विकली जाते. अलिकडे ऍटोमॉटिक मशिनद्वारे अथवा कॉम्प्युटराईज्ड डिझाईन प्रोग्रॅममुळे कुर्त्यावर डिझाईन सहज करता येते. परंतु कोणताही संदर्भ नसताना पारपंरिक पद्धतीने एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे डिझाईन्सची झालेली देवाणघेवाण हिच खरी लखनवी चिकनची वैशिष्ट्ये म्हणावी लागेल.

लखनवी चिकन डिझाईन ही पांढर्‍या धाग्यांबरोबरच अन्य धागे वापरून केली जाते. कुर्ता शिवण्यापूर्वी गळा, बाही यावर उत्तम पद्धतचे विविधरंगी धागे एकमेकांवर स्टिच करुन वेगवेगळ्या डिझाईन करण्याची प्रथा आहे. थोडं जाडसर व एकाच रंगात असलेले कॉटन कापड यासाठी उपयोगात आणले जाते. लखनवी चिकन केलेली साडी विशिष्ट समारंभाप्रसंगी देखील घालण्याची प्रथा आहे. पारंपरिकेतेला आधुनिकतेची जोड देणारी साडी म्हणून याकडे पाहिले जाते. लखनवी चिकन असणारा ड्रेस अथवा कुर्ता आपल्या वार्डरोबमध्ये असायला हरक त नाही आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments