Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परदेशातील गणेश मंदिरे

Webdunia
WDWD
भारतीय संस्कृतीचा प्रभाव ज्या देशांवर पडलेला आहे. त्या सर्व देशात गणेश पूजेची परंपरा प्राचीन आहे. भारताच्या पश्चिमेला तुर्कस्तानपासून ते पूर्वेला जपानपर्यंत, उत्तरेला चीनपासून श्रीलंकेपर्यंत गणेश पूजा केली जाते. त्यामध्ये जपान, चीन, इंडोने‍शिया, जावा, बाली बेटे, म्यानमार , थायलंड, कंबोडिया, मंगोलिया, तुर्कस्तान, नेपाळ, तिबेट, सुमात्रा, अफगाणिस्तान, कोरीया, मेसापोटेमिया संस्कृतीचा प्रदेश यांचा समावेश आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ एलिस यांनी यासंदर्भात एक पुस्तक 1936 मध्ये प्रसिद्ध केले. त्यामध्ये तिने विविध देशातील गणेशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. भारतात गणपतीला सिद्धी विनायक, गजानन, गणेश, गणपती, लंबोदर, वक्रतुंड अशा अनेक नावाने ओळखले जाते. तामिळ भाषेत पिल्लयर, म्यानमारमध्ये महापिएन, जपानी भाषेत कांगीतेन, विनायक, शोदेन, चीनमध्ये कुआन-शी-तिएन, मंगोलियामध्ये बातरलारूमरवागान, तर कंबोडीयामध्ये केनेस नावाने ओळखले जाते.

विविध देशातील गणेश मंदिरांची संक्षिप्त माहिती:
जपान:- जपानमध्ये कांगीतेन, शोदेन आणि विनायक या नावाने गणेशाचा उल्लेख केला जातो. 'कांगीतेन' म्हणजे भाग्याची देवता आणि 'शोदेन' म्हणजे प्रथम देव! हिजोकीत सामान्यत: 'विनायक' शब्दाचा उपयोग केला जातो. जपानी गृह तंत्र धातु योगात वज्रधातु मंडळाचे स्थान ‍अतिशय महत्त्वाचे आहे. या मंडलाच्या रचनेत गणपतीची पाच रूप चित्रित केली आहेत. जपानमध्ये प्रदक्षिणा इशान्य अर्थात पूर्वोत्तर कोनात सुरू केली जाते. 1) पूर्वेला- कोंगो-जाई-तेन (छत्र-विनायक) चे छत्र श्वेत रंगाचे आहे. 2) दक्षिणेला- कोंगो-जिकी-तेन (माल्य-विनायक) यांच्या गळ्यात पुष्पमाळा आहे. 3) पश्चिमेला- कोंगो-एतेनच्या (धनुर्विनायक) हातात धनुष्यबाण आहे. 4) उत्तरेला- जोबुकुतेनच्या (खडग विनायक) हातात खडग असून त्याचा वर्ण लाल रंगाचा आहे. 5) पाचवे कांगीतेनच्या (भाग्य-देवता) एका हातात लाडू आणि दुसर्‍या हातात मुळी आहे.

भारतीयांप्रमाणे जपानमध्ये पूजा करण्यासाठी 'मुद्रा' हे विधान आहे. 'शिंगो-मिक्कयो-झु-इन-शु' नावाचे मंत्रयान-मुद्रा ग्रंथात विनायक मुद्राचा स्पष्ट उल्लेख्‍ा केला आहे. सम्मय-ग्यो-होरिन-इन बोनमध्ये पाच गणेशाचे प्रतीक रूप चित्रित आहे. चार भुजा आणि सहा भुजा असणार्‍या गणेशाचे चित्र एंतजुसी विहारात असून त्याच्या हा‍ता‍त पाश, गदा, लाडू आणि परशू आहे. जिगोंजी विहारात (ताकओ) गणपतीचे एक विशेष मंदिर आहे. येथे प्रत्येक वर्षी विशेष पूजा केली जाते.

चीन:- तनुह-आंग येथे भारतातील अजिंठ्याप्रमाणे येथील गुहेप्रमाणे भिंतीवर गणपतीच्या मूर्ती आहेत. त्याच्या डोक्यावर पगडी आणि सलवार असे वस्त्र परिधान केलेले आहे. अशा प्रकारे अन्य कुंग-हिसएनकेत गणेशाची गुहा-मंदिरे आहेत. या गुहा दीड हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. याशिवाय चीनमधील संग्रहालयात गणपतीचे चि‍त्रे सुरक्षित आहेत. चिनी आणि जपानी बौद्ध लोक विनायक उपासनेत त्रिमूर्ती गणेशाची विशिष्ट रूपात उपासना करतात. या उपासनेला जपानमध्ये 'फो' असे म्हटले जाते.

कंबोडिया:- येथील अंकुर वटाला अंगोरवार या नावाने ओळखले जाते. हे स्थापत्य कला क्षेत्र जगप्रसिद्ध आहे. येथे सुद्धा गणपतीची स्थापना केली जाते. येथील गणपतीचे रूप आणि आकार वेगळा आहे. कंबोडियात गणपतीची कांस्यमूर्ती मिळते.

थायलंड:- येथे गणपतीच्या अनेक आकर्षक आणि कलात्मक मूर्ती आहेत.

बाली:- जमबरन या ठिकाणी गणपती सिंहासनावर बसलेला आहे. त्याच्या हातात मशाल आणि सिंहासनाच्या चारही बाजूने अग्निशिखा आहेत. इतर ठिकाणी गणपतीची उभी मूर्ती दिसून येते. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे जसे भारतीय पुराणात जानवाच्या जागी साप गुंडाळल्याचा उल्लेख मिळतो तसाच उल्लेख येथे मिळतो.

मलया:- धातू आणि दगडाने तयार केलेल्या गणेशाच्या प्रतिमा सापडतात. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशाची सोंड खाली एकदम सरळ जाऊन डोक्याकडे वळते.

जावा:- येथील चंडी-बनोन नावाच्या शिवमंदिरात गणपतीची मूर्ती आहे. नदीकिनारी असलेल्या घाटावर गणपतीच्या अनेक मूर्ती दिसून येतात. जावामध्ये गणपतीच्या स्वतंत्र मंदिराशिवाय शिवाच्या मंदिरातच त्याची पूजा केली जाते. येथील अनेक मूर्ती आपल्याला ब्रिटीश संग्रहालयात दिसून येतात.

म्यानमार:- येथे गणपतीला 'महापिएन' या नावाने ओळखले जाते. गणपती येथील लोकांचे आराध्य दैवत आहे. गणपतीच्या विविध आकार आणि प्रकारच्या अनेक मूर्ती आहेत.

अमेरिका:- बलदेव उपाध्याय यांच्या 'पुराण-विमर्श' नावाच्या पुस्तका‍त अमेरिकेत श्री गणेश मूर्ती सापडल्याचा उल्लेख केलेला आहे.

नेपाळ:- नेपाळ हे हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाते. येथील अनेक ठिकाणच्या बौद्ध मंदिरात गणपतीची मूर्ती दिसून येते. सम्राट अशोकाच्या मुलीने नेपाळमध्ये अनेक बौद्ध मंदिरे निर्माण केलेली आहेत. या मंदिरांमध्ये त्यांनी स्वत: गणपतीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. येथे गणपतीचे विनायक हे नाव अधिक प्रचलित आहे. नेपाळमध्‍ये गणपती मंदिर तयार करताना भारताप्रमाणे पाच देवांची स्थापना करण्याची परंपरा आहे. परंतु, भारतात वेगवेगळ्या पाच देवाच्या प्रतिमा स्थापन केल्या जातात. नेपाळमध्ये गणेश प्रतिमेच्या चारही बाजूने गणपतीचीच प्रतिमा स्थापन केली जाते. त्या सर्वांची विनायक या नावाने पूजा केली जाते. या पाच विनायक नावांमध्ये एक नाव सिद्धी विनायकाचे अस‍ते. आपण सखोल अभ्यास केल्यास असे दिसून येते की, ज्या देशांत बौद्ध धर्माचा विस्तार आहे तेथे गणपती पूजेची परंपरा आहे.

भारतातील गणेश मंदिरे
सर्व पहा

नवीन

Surya Arghya on Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य कसे द्यावे, योग्य पद्धत आणि नियम जाणून घ्या

मुंज मंगलाष्टके

Maha Kumbh 2025: महाकुंभ मेळ्यात जाणे शक्य नसेल तर घरी शाही स्नान कसे करायचे जाणून घ्या

जिवंत मुलीसाठी करणार पिंडदान; दाम्पत्याने महाकुंभात कन्येचे दान केले, साध्वी होणार

ऋण मुक्तीसाठी ऋणमोचन अङ्गारकस्तोत्रम्

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Show comments