Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हरतालिका तृतीयेला देवी पार्वती या 11 गोष्टींमुळे होईल प्रसन्न

Webdunia
रविवार, 28 ऑगस्ट 2022 (12:36 IST)
1. फुलं : फुलं- पानं, जडीबूटी आणि बास यांनी तयार फुलोरा महादेव आणि पार्वती यांना अर्पित केला जातो.
 
2. सौभाग्याच्या वस्तू : देवी आईला सौभाग्याच्या वस्तू अर्पित केल्या जातात ज्यात कुंकु, बांगड्या, जोडवी, मेंदी या प्रकारे 16 श्रृंगाराच्या वस्तू असतात.
 
3. खीर: देवी पार्वतीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने दांपत्य जीवनात प्रेम बहरतं.
 
4. सोळा पत्री : बिल्वपत्र, तुळस, जातीपत्र, शेवंती, बांस, देवदार पत्र, चंपा, कन्हेर, अगस्त्य, भृंगराज, धतूरा, आंब्याची पाने, अशोकाची पाने, विडा, केळीची पाने आणि  शमीची पत्री अर्पित करावी.
 
5. नैवेद्य : देवीला मध, शिरा, गुळ आणि तुपाने तयार पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावे. नंतर दान केल्याने कुटुंबातील आजार आणि दारिद्रय दूर होतं.
 
6. या वस्तू अर्पित करा : पंचामृत, मिठाई, फळ, फुलं, नारळ, कापुर, कुंकु, सुपारी, शेंदूर, अबीर, चन्दन, लाकडाचे चौरंग, पितळ्याचं कळश इतर.
 
7. अभिषेक : दुधात केशर मिसळून महादेव-पार्वती यांचे अभिषेक करावे. सोबत कर्पूर, अगरु, केशर, कस्तूरी आणि कमळाचे जल, आंबा, ऊसाचा रस याने अभिषेक करावे.
 
8. मातीचे शिवलिंग : हरतालिका पूजनासाठी महादेव, पार्वती आणि गणपतीची मूर्ती वाळू रेत किंवा काळ्या मातीने हाथाने तयार करावी आणि मग पूजा करावी.
 
9 कथा श्रवण : व्रत केल्यावर हरतालिका तृतीया व्रत कथा वाचणे किंवा श्रवण करणे आवश्यक आहे.
 
10. जागरण : या दिवशी आठ प्रहर पूजा आणि भजन-कीर्तन करावे.
 
11. पारणं : महादेव, देवी पार्वती आणि गणेशाची मूर्ती सकाळी विधीपूर्वक विसर्जित केल्यानंतर पारणं केलं जातं.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

नृसिंहाख्यान संपूर्ण अध्याय (१ ते १०)

शुक्रवारी या स्त्रोताचे पाठ केल्याने दारिद्र्य नाहीसे होते

आरती शुक्रवारची

Coconut in Holika Dahan होलिका दहनाच्या आगीत नारळ टाकल्याने वाईट नजरेचा प्रभाव नाहीसा होतो

Gudi Padwa 2025: गुढीपाडवा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

पुढील लेख
Show comments