Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hartalika Tritiya 2023 हरितालिका तृतीया या दिवशी महादेव-पार्वती मंत्र जपा, वैवाहिक जीवनात आनंद राहील

Webdunia
सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (10:15 IST)
Hartalika Tritiya 2023 यंदा हरतालिका तीजचा व्रत 18 सप्टेंबरला आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी उपवास करतात. अनेक ठिकाणी अविवाहित मुलीही योग्य वर मिळण्यासाठी हरतालिका तीजचे व्रत आणि पूजा करतात. असे मानले जाते की भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे खूप लाभदायक असते. या दिवशी महिला घरोघरी मातीपासून गौरी शंकराची मूर्ती बनवून त्यांची पूजा करतात. असे मानले जाते की पार्वतीने भगवान शंकरांना आपला वर मिळावा म्हणून हे व्रत केले होते. अशा स्थितीत अखंड सौभाग्याची इच्छा असणाऱ्या महिलांनी हरतालिका तीजचे व्रत अवश्य पाळावे. तसेच गौरी शंकराच्या काही विशेष मंत्रांचा जप करावा. चला जाणून घेऊया या मंत्रांबद्दल...
 
महादेवाचे मंत्र
ॐ  नम: शिवाय
ॐ महेश्वराय नमः
ॐ पशुपतये नमः
 
पार्वती देवींचे मंत्र
ॐ पार्वत्यै नमः
ॐ  उमाये नमः
या देवी सर्वभूतेषु मां गौरी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:
 
सिंदूर अर्पण करण्याचा मंत्र
सिंदूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्।
शुभदं कामदं चैव सिंदूरं प्रतिगृह्यताम्।।
 
सौभाग्य प्राप्ती मंत्र
देहि सौभाग्यं आरोग्यं देहि मे परमं सुखम्।
पुत्र-पौत्रादि समृद्धि देहि में परमेश्वरी।।
 
इच्छित पती मिळविण्यासाठी मंत्र
हे गौरी शंकर अर्धांगिनी यथा त्वं शंकर प्रिया।
तथा माम कुरु कल्याणी कांतकांता सुदुर्लाभाम्।।
 
पतीच्या दीर्घायुष्यासाठी मंत्र
नमस्त्यै शिवायै शर्वाण्यै सौभाग्यं संतति शुभा।
प्रयच्छ भक्तियुक्तानां नारीणां हरवल्लभे।
 
या दिवशी महादेव आणि सखी-पार्वती चे पूजन, आरती आणि कथा केल्याचे खूप महत्तव आहे. या दिवशी स्त्रिया जागरण करुन महादेव आणि देवीची आराधना करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

तुळशीला सिंदूर लावल्यास काय होते?

श्री सूर्याची आरती

आरती शनिवारची

शनि त्रयोदशी 2024 पूजा विधी, साहित्य आणि मंत्र

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments