Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बैलपोळा

- डॉ.प्रकाश खांडगे

Webdunia

दिवस सुगीचे सुरू जाहले

ओला चारा बैल माजले

लेझीम चाले जोरा त


MHNEWS
या ग.ल. ठोकळ यांच्या कवितेची हमखास आठवण होते ती बैलपोळयाच्या दिवशी. श्रावण अमावस्या व भाद्रपद अमावास्या या दोन अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखला जातो. बैलपोळा, नंदी पोळा आणि बेंदूर असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत. नंदी किंवा नंदीबैल पूजनिय असतो. त्याचे कारण म्हणजे तो शिवाचे वाहन आहे. शिवाचे वाहन असणारा नंदी हा पुढे मार्तंड भैरवरूप खंडोबाचे वाहन घोडा झाला. त्या विषयाचा उल्लेख असा...

' शिवाने मार्तंड भैरवाचा अवतारा घेतला तेव्हा तो नंदीवर बसून आला होता. परंतु पुढे मणी दैत्याचा वध केल्यावर त्याने मणीच्या विनंती वरून मणीचा अश्वासहित रूपाचा स्वीकार केला. आणि म्हणून घोडा हे खंडोबाचे वाहन म्हणून प्रचिलीत झाले. प्रस्तुत माहात्म्य कथेतही सप्तर्षीनी व देवांनी बनविलेल्या मल्लारी-मार्तंडाची मूर्ती अश्वसहित असल्याचे म्हटले आहे. इतर काही माहात्म्यकथांत असे ही सांगितले आहे की, गुरूद्रोहामुळे शापित झालेला चंद्रमा जलरूप झाला. परंतु पुढे 'शिव जेव्हा भैरवरूप धारण करतील तेव्हा वाजित्व प्राप्त होई ल` अशी आकाशवाणी झाली. आणि म्हणून चंद्राच्या विनंती वरून मार्तंड भैरवाने चंद्राचा तुरगरूपात स्वीकार केला.

ग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण आहे. अमावस्येच्या आदल्या दिवशी खांदमळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळण्यात येते त्याला खांदमळणी असे म्हणतात. या दिवशी शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची प्रथा आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन नविन बैलाच्या नाकात घातली जाते. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. वर्षभर शेतात राबणारा बैल पोळयाच्या दिवशी मात्र नवरदेव असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. पोळ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा प्राचीन काळापासून आजतांगायत चालू आहे. गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी त्याला सोडीत. आश्विन व कार्तिक महिन्यांच्या पौर्णिमेला होणार्‍या उत्सवात मुख्यत्वे पोळा सोडीत. सोडण्यापूर्वी त्याला धुवीत, रंगवीत, सजवीत आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गाई आणून उभ्या करीत. मग त्याच्या कानात 'तू वासरांचा पित ा` अशा अर्थाचा मंत्र म्हणत. 'हा तुमचा पती आहे.` अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत. पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वषिंड मोठे, शेपटी मऊ व लांब केसांची, गाल कोवळे, पृष्ठभाग रूंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकेदार, बांधा डौलदार, डरकाळी मेघगर्जनेसारखी असावी व त्याच्या तोंडात अठरा दात असावे, असे मत्स्य पुराणात सांगितले आहे.

दहा गायींच्या कळपात किमान चार बैल असावे, असे अर्थशास्त्रात सांगितले गेले आहे. बैल विकत घेताना प्रथम त्याचे वय विचारात घ्यावे. दात आणि शिंगे यांच्यावरून बैलाच्या वयाचा अदमास घेता येते. बैल चांगला की वाईट ते ठरवण्याची अनेक लक्षणे आहेत. काळा बैल उत्तम, काळया-तांबडया संमिश्र रंगाचा माध्यम व केवळ शुभ्र वर्णाचा त्याज्य समजावे. ज्याचा पार्श्वभाग रोडावलेला आहे. ज्याचा कान व शेपूट तुटलेली आहे असा बैलही अग्राह्यच. ज्याचे खुर बैगणी तो बैल मजबूत व ज्याच्या खांद्यांचा वर्ण निळा, तो बैल मर्द समजावा. शेपटीचा गोंडा काळा व ज्याच्या कानावर केस असतील तो बैल भाग्यवान असतो. लांब शिंगांच्या बैलाविषयी एका लोकगीतात म्हटले आहे, ते असे-

बडसींगा जनी लीजौ मोल । कुएँमे डारो रूपिया मोल ।
असा हा बैल महिमा आहे. बैलपोळयाच्या दिवशी रणहलगी, शिंग, ढोल, लेझीम अशी वाद्ये वाजवून गावभर बैल मिरविले जातात. शेतकरी विविध क्रीडागीते, लोकनृत्ये सादर करतात.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

सर्व पहा

नक्की वाचा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments