Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

`परीक्षक चुका सांगतात तेव्हा वाईट वाटते`

Webdunia
NDND
जीव तोडून केलेल्या मेहनतीनंतर गायनादरम्यान परीक्षक चुका सांगतात, त्यावेळी वाईट वाटते. पण त्यांचे सल्लेच पुढे उपयोगी ठरतात. कारण हे सल्ले त्यांच्या दीर्घकालीन मेहनतीतून आलेले असतात.... झी मराठीवर सध्या सुरू असलेल्या सारेगमप 'स्वप्न स्वरांचे' या महागायक निवडण्याच्या स्पर्धेतील अंतिम पाच स्पर्धकांत असलेला अनिरूध्द जोशी सांगत होता.

सध्या या कार्यक्रमात नागपूरच्या अनिरूध्दसोबत सायली पानसे, सायली ओक, वैशाली भैसने- माडे व चैतन्य कुलकर्णी सहभागी आहेत. तब्बल दहा हजारांहून अधिक स्पर्धकांमधून ३२ जण निवडण्यात आले होते. त्यांचे 11 समूह करण्यात आले होते. त्यातील आता केवळ पाच स्पर्धक राहिले आहेत. त्यातील एक अनिरूद्ध आहे. ही स्पर्धा त्यातील परीक्षक देवकी पंडीत व अवधुत गुप्ते यांच्या परीक्षणासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. विशेषतः देवकीताईंचा स्वरांच्या अचुकतेचा आग्रह व बारकाईने गाणे ऐकून केलेल्या सूचना आणि अवधुत गुप्तेंचा सळसळता उत्साह यामुळे ही स्पर्धा चर्चेत आहे.

अनिरूध्‍द पुढे म्हणाला, की या कार्यक्रमादरम्यान परीक्षक देवकी पंडीत व अवधुत गुप्ते यांच्याबरोबरच वेळोवेळी आलेल्या मान्यवर परीक्षकांनी दिलेल्या टिप्स आयुष्यात पुढे खूप उपयोगी पडतील.
याविषयी बोलताना अनिरूद्ध म्हणाला, की या स्पर्धेत गायकाच्या गुणवत्तेवरच भर दिला जातो. इतर टेंलेंट शोप्रमाणे हावभाव किंवा नृत्य या बाबींकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढतो. विशेष म्हणजे अंतिम दहा स्पर्धकांपर्यंत या कार्यक्रमाचे अधिकार संपूर्णपणे परीक्षकांच्या हाती असतात. एसएमएस त्यानंतर सुरू होतात. त्यातही पुढच्या फेऱ्यांमध्ये परीक्षकांच्या एसमएमएसचे महत्त्व कमी होत असले तरी ते पन्नास टक्कयांपुरते उरते. अंतिम निर्णय फक्त पूर्णपणे एसएमएसवर होतो.

बाहेर जाणाऱ्या स्पर्धकांविषयी बोलताना अनिरूद्ध म्हणाला, टॅलेंट हंट शोचे शूटींग खूप दिवस सुरू असते. या काळात सर्व स्पर्धक एकमेकांचे चांगले मित्र बनतात. स्पर्धा फक्त पडद्यावर असते. त्याच्या मागे मात्र आम्ही सर्व चांगले मित्र असतो. पण कार्यक्रमातून बाहेर जायची वेळ येते तो क्षण मात्र फारच दुःखद असतो. एवढ्या दिवसांचे ट्यूनिंग जुळलेला एक चांगला मित्र किंवा मैत्रिण बाहेर गेली की त्यानंतर गाणे सादर करणे फार त्रासदायक जाते.

अनिरूध्‍द पुढे म्हणाला, की या कार्यक्रमादरम्यान परीक्षक देवकी पंडीत व अवधुत गुप्ते यांच्याबरोबरच वेळोवेळी आलेल्या मान्यवर परीक्षकांनी दिलेल्या टिप्स आयुष्यात पुढे खूप उपयोगी पडतील. गाण्याची प्रत्येक ओळ गाताना स्वरातील उतार चढाव कसा हवा, याविषयी अनुभवी गायकच सल्ला देऊ शकतात. एका एपिसोडमध्ये जेव्हा मी कुमार गंधर्व यांचे ' आज अचानक' हे गीत गायले. त्यावेळी मला खूप टिप्स मिळाल्या. देवकी पंडित व अवधूत गुप्ते यांनी मला आलाप व स्वर लावण्यासंबंधात जे सल्ले दिले ते पुढे नक्कीच कामात येतील.

सारेगमपच्या प्रत्येक एपिसोडच्या शूटींगनंतर सात दिवसांचे अंतर असते. या दरम्यान सगळे स्पर्धक परीक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून टिप्स घेतात, अशी माहिती त्याने दिली. या कार्यक्रमात यानंतर तीन फेऱ्या होतील. जे चांगले सादरीकरण करतील, त्यातील तिघांना महाअंतिम फेरीसाठी निवडण्यात येईल.

( नई दुनिया)

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments