Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकट्याने प्रवासाची भीती वाटते

Webdunia
शनिवार, 20 सप्टेंबर 2014 (13:11 IST)
‘स्वप्नाली लाड हिच्या प्रकरणानंतर रिक्षातून एकट्या महिलेला प्रवासाची दहशत बसली होती. शूटिंगवरून रात्री-अपरात्री एकाकी घरी परततांना भीती वाटू लागली आहे. अनेकदा घराखाली फेरफटका मारतांनाही असुरक्षित वाटते’, अशा शब्दांत आघाडीची मराठी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने सध्याच्या भयग्रस्त परिस्थितीबाबत तरुणींची मानसिकता वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसमोर व्यक्त केली. या पाश्र्वभूमीवर एकाकी महिला प्रवाशांनी स्मार्ट ओळखपत्र असलेल्या रिक्षांमधूनच प्रवास करावा, असे आवाहन मृणालने केले. या स्मार्ट कार्डासाठी वाहतूक पोलिसांनी रिक्षा संघटनांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून सदस्यांची माहिती फॉर्मद्वारे गोळा केली. त्या आधारे तयार झालेल्या स्मार्ट कार्डाचे वाटप पोलीस रिक्षामालकांना करत आहेत. आतापर्यंत पाच हजार रिक्षामालकांनी त्यासाठी नोंदणी केल्याची माहिती वाहतूक शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली. या कार्डसाठी रिक्षामालकांना अवघा शंभर रुपये खर्च करावा लागत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

प्रेक्षणीय स्थळ गोकर्ण

चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला अनेक सूट, परदेशात जाण्याचीही परवानगी

कार्तिक आर्यनला 10 वर्षांनंतर अभियांत्रिकीची पदवी मिळाली

रमणीय स्वित्झर्लंड मधील सात प्रमुख पर्यटन

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील 'भसड़ मचा' या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

Show comments