Dharma Sangrah

Halloween हॅलोविनच्या दिवशी आत्मा त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला येतात, जाणून घ्या अनोखी कहाणी

Webdunia
शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025 (12:41 IST)
Halloween हॅलोविन हा एक असा सण आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आत दडलेला सैतान बाहेर काढू शकता. तो दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. ख्रिश्चन ऑल हॅलोज फेस्टच्या आदल्या दिवशी संध्याकाळी साजरा केला जातो. या दिवशी लोक भुताटकीचे कपडे परिधान करतात, भितीदायक मेकअप लावतात, बॉनफायर लावतात, ट्रिक आणि ट्रीट करत आवडते पदार्थ खातात आणि  त्यांच्या मित्र आणि कुटुंबावर प्रँक्स करतात. हा सण मस्ती आणि विनोदांनी भरलेला असतो, त्यामुळे अनेकांना हॅलोविनची विशेष प्रतीक्षा असते. पण तुम्हाला माहित आहे का की हॅलोविनची सुरुवात कशी झाली आणि इतर सणांपेक्षा तो भुताटकीच्या थीमवर का साजरा केला जातो.
 
हॅलोविन का साजरा केला जातो?
हॅलोविन प्रथम स्कॉटलंड आणि आयर्लंडमध्ये साजरा करण्यात आला. हा एक सेल्टिक सण आहे, जो समहेन म्हणून ओळखला जात असे. उन्हाळ्याच्या शेवटी आणि हिवाळ्याच्या सुरुवातीस चिन्हांकित करण्यासाठी तो साजरा केला गेला. हिवाळ्याची सुरूवात म्हणून शेकोटी पेटवली जाते. असा विश्वास होता की या दिवशी जिवंत आणि मृत यांच्यातील दार उघडते आणि आत्मे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटायला येतात. असेही मानले जात होते की हिवाळा हा काळोख आणि अंधकाराने भरलेला वर्षाचा काळ असतो आणि यावेळी दुष्ट आत्मे पृथ्वीवर येतात. त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लोक जमतात बॉनफायर करतात प्रार्थना करतात जेणेकरून त्यांचे वाईट शक्तींपासून संरक्षण होईल असे समज आहे.
 
भूत पोशाख का परिधान केले जातात?
पूर्वी लोकांचा असा विश्वास होता की या दिवशी दुष्ट आत्मे पृथ्वीवर फिरतात. त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, लोक वेगवेगळ्या प्रकारचे भितीदायक कपडे घालायचे जेणेकरुन दुष्ट आत्मे त्यांना ओळखू शकत नाहीत आणि त्यांच्यापासून दूर राहतील. तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे आणि आजही लोक भितीदायक पोशाख घालतात. मात्र आता लोक भुताटकी वेशभूषा करून, भितीदायक चित्रपट पाहून आणि कँडी खाऊन एकमेकांसोबत मजा करतात. पिशाच्चाला दूर ठेवण्यासाठी भोपळे कोरण्यात येत होते असेही मानले जाते. ही प्रथाही अशीच सुरू आहे आणि आजही लोक आपल्या घरात भोपळे कोरतात आणि घर सजवतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Chaat Recipes Without Oil तेलाशिवाय बनवा स्वादिष्ट चाट

गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात या गोष्टींची काळजी घ्या

बीबीए अॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट मध्ये करिअर बनवा

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

अकबर-बिरबलची कहाणी : तीन रुपये, तीन गोष्टी

पुढील लेख
Show comments