Dharma Sangrah

परीक्षेत फक्त अभ्यास नव्हे तर जीवनशैली आणि खानपानाची देखील काळजी घ्या

Webdunia
परीक्षा दरम्यान अभ्यासाप्रमाणे आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांच्या या गोष्टींकडे मुळीच दुर्लक्ष करू नका, कारण यावेळी मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारांनी परीक्षेसाठी तयार होण्याची गरज आहे.
 
साधारणपणे परीक्षा दरम्यान मुले खाणं-पिणं विसरतात आणि सतत अभ्यासात लागले राहतात. हे मुळीच बरोबर नाही. या दरम्यान, आपण आहाराची देखील पूर्ण काळजी घ्यावी. जेव्हा परीक्षा जवळ येत असेल किंवा सुरू असेल तेव्हा काळजीपूर्वक आहार निवडा. खाली वर्णन केलेल्या या टिप्स, या कार्यामध्ये आपल्याला मदत करतील -
 
1. फास्ट फूडपासून दूर राहणे आवश्यक आहे, कारण परीक्षा दरम्यान फास्ट फूडमुळे एकाग्रतेत कमी येते.
 
2. परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी बॅलेंस डायट घ्यावी. द्रवपदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करावे.
 
3. डॉक्टरांप्रमाणे हेल्दी फूड खाण्याने स्मरण शक्ती तर वाढतेच, तंदुरुस्ती देखील राखली जाते.
 
4. हेल्दी फूड घ्यावे यासाठी सीबीएसईनेदेखील आपल्या हेल्पलाइन वेबसाइटवर विद्यार्थ्यांना धान्य खाण्यासाठी टिपा दिल्या आहेत.
 
5. मुलांच्या खाण्या-पिण्याचा वेळ ठराविक असल्यास अधिक योग्य. आहारामध्ये अधिक वेळेचा अंतर नसावा. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न स्टिकी नसावं.
 
6. खाण्यात-पिण्यात प्रोटीन अधिक प्रमाणात घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही वेळेचा आहार चुकवून चालणार नाही.
 
याव्यतिरिक्त थोड्या-थोड्या वेळाने हलके फुलके पदार्थ सेवन करणे योग्य ठरेल. जसे भाजलेले धान्य, पॉपकॉर्न, पोहा व इतर पदार्थ सेवन करू शकता. 
 
* असा असावा आहार
 
1. भरपूर दूध, दही, अंडी घ्या.
2. कमीतकमी फास्ट फूड घ्या.
3. फळं, फळांचा रस, लिंबू पाणी, सूप वारंवार घ्यावे.
4. चहा पिण्याची सवय असल्यास, हर्बल टी घेणे अधिक योग्य.
5. अन्न सोडल्याने एकाग्रता कमी होते.
6. रात्रीचे जेवण हलके असावे. त्यात ओटमील, कॉर्न किंवा पोळी-भाजी खाल्ली जाऊ शकते.
7. नाश्त्यात घरी तयार भेलपुरी, टोस्ट, पनीर, सॅलड, मधासह ड्राय फ्रूट्स इतर पदार्थ सेवन करू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

'Bhanu Saptami' 2026 भानू सप्तमी विशेष सूर्याला प्रसन्न करण्यासाठी सात्विक आणि गोड नैवेद्य पाककृती

नाश्त्यात या ३ गोष्टी खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहाल आणि अशक्तपणा दूर होईल

बीकॉम प्रोफेशनल अकाउंटिंगमध्ये करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

Rath Saptami 2026 रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्पण करा हा विशेष नैवेद्य

पुढील लेख
Show comments