Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीज बिल जास्त येतं, या टिप्स अवलंबवा

Webdunia
शुक्रवार, 11 मार्च 2022 (16:42 IST)
वीज बिल जास्त आल्यावर टेंशन वाढते. कितीही काटकसर केली तरीही बिल जास्त आल्यावर धडकी भरते. आपल्या घरातील उपकरणे पंखा, फ्रीज, टीव्ही, वॉटर हीटर, वॉशिंग मशिन, कुलर, एसी ही प्रत्येक घराची गरज आहे. त्यांच्याशिवाय काम करणे कठीण आहे. हे विजेशिवाय चालत नाही. आणि याच्याशिवाय आपले काम होत नाही. 
अशा परिस्थितीत काय करावे समजत नाही. वीजबिल कसे कमी करायचे हे जाणून घ्या. या साठी काही टिप्स अवलंबवून आपण विजेचे बिल कमी करू शकता. 
 
वीज बिल कमी करण्यासाठी उपाय- 
 
* पंख्यांसाठी नवीन रेग्युलेटर लावा. पंखे हे दिवसभर चालतात पण दिवे मात्र रात्रीच लावले जातात. पंखे वीजबिल वाढवतात. जुना पंखा असल्यास त्वरित बदलावा. जेणे करून तो जास्त वीज घेतो. आजकल कमी वॉट चे पंखे येतात जे कमी वीज वापरतात. 
 
* मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा इत्यादी चार्जरचे प्लग वापरल्यानंतर काढून टाकावेत.
 
* वापरात नसताना दिवे बंद करण्याची सवय लावा. ही पहिली गरज आहे आणि सर्वांना माहित आहे, परंतु लक्ष देत नाही.
 
* बल्ब, ट्यूबलाइट इत्यादींवर साचलेली धूळ नियमितपणे स्वच्छ करा. धुळीमुळे लाईट कमी मिळते आणि जास्त दिवे लावावे लागतात.
 
* जुना बल्ब किंवा ट्यूब लाईट ऐवजी एलईडी वापरा.
 
*  जुन्या कॉपर चोकऐवजी नवीन इलेक्ट्रॉनिक चोक किंवा एलईडी असलेली ट्यूबलाइट वापरा.
 
* आवश्यक त्या ठिकाणी दिवा लावण्याचा प्रयत्न करा. जसे रात्री टेबल लॅम्प लावा.
 
* नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करा. खोलीत हलका सावलीचा रंग करा. फक्त पडदे इत्यादींसाठी हलके रंग वापरा.
 
*  इलेक्ट्रिकल केतली, म्हणजे पाणी गरम करण्यासाठी केटल वापरत असाल तर ते नियमितपणे स्वच्छ करा.
 
*  तापमान वाढल्यावर इलेक्ट्रिक इस्त्री आपोआप बंद होणारी घ्या. इस्त्रीचे रेग्युलेटर योग्य स्थितीत ठेवा. ओल्या कपड्यांना इस्त्री करू नका. इस्त्री करताना कपड्यांवर जास्त पाणी शिंपडू नका.
 
 *  विनाकारण गिझर चालू ठेवू नका. गिझरचे तापमान जास्त ठेवू नका.
 
संगणकाचा कमी उर्जा वापर
 
* कॉम्प्युटर, टीव्ही, म्युझिक सिस्टीम वगैरे काम करत नसेल तर वीज स्वीच बंद ठेवा, नाहीतर विजेचा वापर सुरूच राहील.
 
* संगणक चालू ठेवणे आवश्यक असल्यास, मॉनिटर बंद करा.
 
* ऊर्जा बचत पद्धतींबद्दल माहिती मिळवा आणि त्यांचा वापर करा. यामुळे विजेची मोठी बचत होते.
 
* काही लोक स्क्रीन सेव्हरला वीज वाचवण्याचे साधन समजतात, परंतु ते फक्त स्क्रीन वाचवतात, वीज नाही.
 
* ओटीजी ऐवजी मायक्रोवेव्ह ओव्हन वापरा. ओटीजी मायक्रोवेव्हपेक्षा जास्त वीज वापरते.
 
 * इलेक्ट्रिक ओव्हन वारंवार उघडू नका. एकदा उघडल्यानंतर, तापमान 25 अंशांपर्यंत कमी केले जाते.
 
* फ्रीज भिंतीच्या खूप जवळ ठेवू नका, हवा फिरण्यासाठी जागा सोडा.
 
* फ्रीज फार कमी तापमानात सेट करून ठेवू नका.
 
* फ्रीजचे दरवाजे हवाबंद असावेत. जर दरवाजाचे रबर पॅकिंग खराब झाले असेल तर ते बदलले पाहिजे.
 
*  द्रव पदार्थ झाकून ठेवावेत. ज्यामुळे रेफ्रिजरेटरच्या कंप्रेसरची कार्यक्षमता वाढते.
 
* रेफ्रिजरेटरचा दरवाजा वारंवार उघडू नका. रेफ्रिजरेटरचा दरवाजा जास्त वेळ विनाकारण उघडा ठेवू नका.
 
* फार गरम वस्तू फ्रीजमध्ये ठेवू नका.
 
* रेफ्रिजरेटर थेट सूर्यप्रकाश, ओव्हन आणि स्टोव्हची उष्णता इत्यादीपासून दूर ठेवावे.
 
* कमीत कमी सामान फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरुन हवा फिरण्यास जागा असेल.
 
* वॉशिंग मशीनमध्ये संपूर्ण कपडे धुवा. दोन-चार कपड्यांसाठी वॉशिंग मशीन चालवू नका.
 
*  पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करा.
 
* टायमर वापरा.
 
* योग्य प्रमाणात वॉशिंग पावडर वापरा.
 
*  इलेक्ट्रिक ड्रायरऐवजी नैसर्गिकरित्या कपडे कोरडे करा.
 
* AC सोबत छोटा पंखा वापरावा जेणेकरून थंड हवा संपूर्ण खोलीत पसरेल.
 
* खूप कमी तापमानात एसी चालवू नका. 25 अंशांवर ठेवा, यामुळे कमी खर्चात योग्य तापमान मिळेल.
 
* दारे आणि खिडक्यां योग्यरित्या बंद केले पाहिजे.
 
* AC वर थेट सूर्यप्रकाश पडू नये. सावलीत ठेवलेल्या एसीचे बिल 10% कमी येते.
 
* एसीमधून बाहेर येणारा पाण्याचा पाइप अशा प्रकारे सोडा की त्यात पाणी साचणार नाही.
 
* एसी फिल्टर नियमितपणे स्वच्छ केले पाहिजेत. जेव्हा फिल्टर गलिच्छ होते, तेव्हा AC मधील विजेचा वापर वाढतो.
 
* जर एसी जास्त जुना असेल तर नवीन स्टार रेटिंगचा एसी घ्यावा. 
 
* सेट टॉप बॉक्स, टीव्ही, मायक्रोवेव्ह, गिझर, एसी आदींचे प्लग काढले जात नाहीत. प्लग इन केले असल्यास, ते स्विच बंद असतानाही वीज वापरतात. त्यांचे स्वीच बंद असतानाही, प्लग इन केल्यामुळे ते न्यूट्रल वायरमधून वीज घेतात. त्यामुळे प्लग काढून टाकावेत, अन्यथा ते रात्रभर वीज बिल वाढवत राहतात.
 
हे सर्व उपाय अवलंबवल्यास विजेचं बिल नक्कीच कमी येणार. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

त्वचेची घट्ट छिद्रे उघडण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय वापरून पहा

प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे धनुरासन! 7 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : उंटाची मान

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

पुढील लेख
Show comments