Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कशी पडली महिन्यांची नावे?

Webdunia
जानेवारी: रोमन देवता जेनस वरून जानेवारी नाव पडले. या देवाला दोन तोंडे असल्याची आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे जानेवारीमध्‍ये मागील वर्षाला न विसरता नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.
 
फेब्रुवारी: या महिन्याची उत्पत्ती रोमन उत्सव फेब्रआ पासून झाली.
 
मार्च: रोमच्या बुद्धदेवते मार्टियुस अर्थात मार्स यावरून मार्च महिन्याचे नाव ठेवण्यात आले.
 
एप्रिल: लॅटिन भाषेच्या एपिरर या शब्दावरून एप्रिल शब्द आला. या शब्दाचा अर्थ आहे ‘उघडणे’.
 
मे: मे महिन्याचे नाव रोमची देवी मायमा वरून निघाले.
 
जून: स्वर्गाची राणी जुनो वरून जून हे नाव ठेवण्यात आले.

जुलै: ज्युलियस सीझर या महिन्यात जन्माला आला, म्हणून जुलै.
 
ऑगस्ट: रोमचा राजा ऑगस्टसने याच महिन्यात बर्‍याच ठिकाणी विजय मिळवला होता. त्यांच्या सन्मानार्थ या महिन्याला ऑगस्ट नाव देण्यात आले.
 
सप्टेंबर: पूर्वीच्या काळी रोम कॅलेंडरनुसार हा महिना सातवा होता. हे नाव लॅटिन भाषेवरून घेण्यात आले. ज्याचे नातं सात या आकड्याशी आहे.
 
ऑक्टोबर: या महिन्याचे नावदेखील लॅटिनच्या ऑक्टोमवरून निघाले. प्राचीन रोमन कॅलेंडरमध्‍ये या महिन्‍याला आठवे स्थान होते. मात्र, आता हा दहावा महिना आहे.
 
नोव्हेंबर: या महिन्याचे नाव लॅटिन भाषेच्या नोव्हेनवरून घेण्यात आले. कारण त्या काळात कॅलेंडरनुसार हा महिना नवा होता.
 
डिसेंबर: लॅटिन भाषेच्या डिसेमवरून डिसेंबर नाव पडले. ज्याचा अर्थ दहावा असा होता. आता हा वर्षाचा शेवटचा आणि बारावा महिना आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments