Dharma Sangrah

ताजमहाल कोणी व का बांधला?

Webdunia
गुरूवार, 9 एप्रिल 2015 (14:56 IST)
शहाजहान या दिल्लीच्या मोगल सम्राटाने (१६१४-१६६६) मुमताज नावाच्या आपल्या लाडक्या राणीच्या स्मरणार्थ हा महाल बांधला. दिल्लीजवळील आग्रा या गावी ही देखणी इमारत आहे. जगातल्या सुंदर इमारतींमध्ये ही इमारत श्रेष्ठ गणली जाते. पर्शियन संस्कृतीचे दर्शन या बांधकामात घडते. या इमारतीच्या नावाचा अर्थ 'महालांचा मुकुटमणी' असा होतो. पांढरा संगमरवरी दगड वापरून आणि किमती खड्यांनी नक्षी करून या अष्टकोनी इमारतीचे सौंदर्य वाढविलेले आहे. १३0 फूट रुंद आणि २00 फूट उंच अशी ही देखणी इमारत आले. यमुनेच्या तिरावर ती उभी आहे. सभोवती पर्शियन बागांची योजना करून ती अधिक सुशोभित केली आहे.
 
आत घुमटाखाली शहाजहान आणि मुमताज बेगम यांची स्मारके आहेत. आतल्या भिंतींवर फुलांची नक्षी आणि कुराण-धर्मग्रंथातील वचने आहेत. यासाठी अनेक मौल्यवान दगड वापरले आहेत. प्रत्यक्ष राजा-राणी यांच्या कबरी तळघरात असून, तेथे अत्यंत साधेपणा आढळतो.
 
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

'बोटं चाटून खातील' अशी चविष्ट मसाला गिलक्याची भाजी नक्की ट्राय करा

हाडांची कमजोरी आणि सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, केल्शियमची कमतरतेची लक्षणे जाणून घ्या

Career in Bachelor of Technology B.Tech inTextile Technology Engineering: बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बीटेक इन टेक्सटाइल टेक्नोलॉजी इंजिनियरिंग करून करिअर बनवा, पात्रता जॉब व्याप्ती जाणून घ्या

केस गळणे थांबवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शॅम्पूऐवजी रीठाने केस धुवा

पोट आणि हृदय मजबूत ठेवायचे असेल, तर २४ तासांचा उपवास सुरू करा, फायदे जाणून घ्या

Show comments