Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tuesday Born तुमचा जन्म मंगळवारी झाला असेल तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 19 जुलै 2022 (13:45 IST)
आठवड्याच्या सात दिवसांपैकी कोणत्या दिवशी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला असतो, ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून त्याचे भविष्य, स्वभाव, वैवाहिक जीवन या सर्व गोष्टींची माहिती मिळू शकते. आज मंगळवारी जन्मलेल्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत. मंगळवारी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा प्रभाव दिसून येतो. मंगळाची प्रकृती थोडी उग्र आहे, ज्याचा प्रभाव मंगळवारी जन्मलेल्या लोकांवर दिसून येतो. ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ, जन्मवार पाहिल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल सर्व काही सांगतात.
 
वर्तन
मंगळवारी जन्मलेले लोक रागीट, उग्र आणि धाडसी स्वभावाचे असतात. हे लोक संकटात लवकर गुडघे टेकत नाहीत. कोणाचीही चूक त्यांना मान्य नाही. मंगळवार मंगळ ग्रहाशी संबंधित आहे आणि नऊ ग्रहांपैकी मंगळ ग्रहाला सेनापतीचा दर्जा आहे, त्यामुळे मंगळवारी जन्मलेले लोक खूप सक्रिय आणि उत्साही असतात. धैर्यवान आहेत. ते दबंग असतात आणि हुशार देखील असतात. ते मनाने दयाळू असून आणि इतरांना मदत करण्यास नेहमी तयार असतात. ते कोणत्याही कामात खूप गंभीर असतात. अत्यंत कठीण परिस्थितीतही हे लोक घाबरत नाहीत आणि अडचणींचा खंबीरपणे सामना करतात. अशा लोकांना चुकीचे बोलणे सहन होत नाही. एकदा कोणी त्यांचा विश्वासघात केला तर ते त्याला माफ करत नाहीत.
 
राजेशाही 
लाइफस्टाइलमध्ये तुम्हाला ती नेहमीच पाहायला मिळेल. मंगळवारी जन्मलेले लोक खूप महागडे स्वभावाचे असतात. या लोकांना खरेदीची खूप आवड असते. मंगळवारी जन्मलेल्या लोकांना विलासी जीवन जगणे आवडते. त्यांना घरातील चैनीच्या वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असते. 
 
नकारात्मक बाजू
मंगळवारी जन्मलेले लोक लहानसहान गोष्टींवर रागावतात. त्यांच्या चटकन रागामुळे ते लोकांशी फार काळ जमत नाहीत. मित्र असोत की नातेवाईक, प्रत्येकजण त्यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले मानतो.  मंगळवारी जन्मलेल्या लोकांवर मंगळ ग्रहाचा जास्त प्रभाव पडतो, ज्यामुळे ते काही वेळा थोडे उग्र असू शकतात. पण लवकरच त्यांचा रागही शांत होतो. त्यांचा वीक पॉइंट असा आहे की त्यांना कोणत्याही गोष्टीचा लवकर कंटाळा येतो. 
 
प्रत्यक्ष देखावा
ज्यांचा जन्म मंगळवारी झालेला असतो ते मांसल शरीराचे असतात. शारीरिक दिसण्यामुळे त्यांची पोलीस किंवा सैन्यात भरती होण्याची शक्यता वाढते. 
मंगळवारी जन्मलेले लोक प्रामाणिक असतात. कठोर परिश्रम करतात आणि जे काही साध्य करतात ते स्वतः करतात. 
 
नोकरी
मंगळवारी जन्मलेले लोक पोलिस, आर्मी, मेकॅनिक, इंजिनियर, मार्केटिंग किंवा मशीनरी इत्यादी क्षेत्रात अधिक यशस्वी असतात.
 
वैवाहिक जीवन
मंगळवारी जन्मलेल्या लोकांचे प्रेम आणि वैवाहिक जीवन चांगले असते. त्यांना सुंदर जीवनसाथी मिळतो. याशिवाय ते त्यांच्या कुटुंबासाठी एकनिष्ठ असतात.
 
मंगळवारी जन्मलेल्या मुली
मंगळवारी जन्मलेल्या मुली स्वावलंबी असतात. स्वतःचे निर्णय घेतात. याशिवाय त्यांचा स्वभाव निडर असतो. मंगळवारी जन्मलेल्या मुली लवकर रागावतात, मात्र त्यांचा रागही लवकर शांत होतो.
 
भाग्य उजळण्यासाठी हे करावे
मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी जन्मलेल्या लोकांनी हनुमानजींची पूजा करावी. मंगळवारी हनुमान चालिसा आणि संकटमोचनाचे पठण करावे. यामुळे हनुमानजींची कृपा सदैव त्यांच्यावर राहते. त्यांच्यावर कोणतेही संकट येत नाही.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments