Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कोणती धातू आहे भाग्यशाली

Webdunia
गुरूवार, 31 जानेवारी 2019 (00:51 IST)
ज्योतिष्यात नव ग्रह सांगण्यात आले आहे आणि सर्व ग्रहांशी निगडित वेग वेगळ्या धातू सांगण्यात आल्या आहेत. पत्रिकेत जर एखादा ग्रह अशुभ असेल तर त्याच्याशी निगडित उपाय केल्याने दोषांपासून मुक्ती मिळू शकते. ग्रह दोष दूर करण्याचा एक उपाय असा देखील आहे की आमच्या राशीचे   स्वामी ग्रह आणि मित्र ग्रहांशी निगडित धातू आपल्याजवळ ठेवायला पाहिजे. धातूची अंगठी बनवून हातांच्या बोटात किंवा चेनमध्ये नाहीतर ब्रेसलेटच्या रूपात हातात धारण करू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर शुभ धातूच्या इतर वस्तू देखील तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. येथे जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कोणती धातू भाग्यशाली आहे …
 
राशिनुसार भाग्यशाली धातू 
 
सोन - गुरु सोन्याचा कारक ग्रह आहे. ही धातू मेष, कर्क, सिंह, धनू आणि मीन राशीसाठी शुभ असते.  
 
तांबा- या धातूचा कारक ग्रह सूर्य आहे. ज्या लोकांची राशी मेष, सिंह किंवा वृश्चिक आहे, त्यांच्यासाठी ही धातू फायदेशीर असते.  
 
लोह - ग्रहांचा न्यायाधीश शनिदेव लोखंडाचे कारक ग्रह आहे. ही धातू मकर आणि कुंभसाठी श्रेष्ठ फळ देणारी असते.  
चांदी- या धातूचा स्वामी चंद्र आहे. ही धातू वृषभ, कर्क, तूळ, वृश्चिक आणि मीन राशीसाठी फायदेशीर असते.  
 
पितळ - या धातूचा संबंध गुरु ग्रहाशी असतो. ज्या लोकांची राशी मेष, कर्क, सिंह, धनू आणि मीन असते त्यांच्यासाठी लाभदायक होऊ शकते.  
 
कांसा- ही एक मिश्रित धातू आहे. ही बुध ग्रहाशी निगडित धातू मानण्यात आली आहे. मिथुन आणि कन्या राशिसाठी ही धातू फारच शुभ असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शनिवारची

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments