Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जन्म महिन्याप्रमाणे जाणून घ्या कशा असतात मुली

Webdunia
जानेवारी- वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीत जन्म घेतलेल्या मुली स्वभावाने गंभीर आणि जरा पुराणमतवादी असतात परंतू त्या खूप महत्वाकांक्षीही असतात. या स्त्रिया समीक्षकच्या भूमिकेत राहणे पसंत करतात. यांना आपल्या भावना कुणासोबत शेअर करायला आवडत नाही. या केवळ त्यांच्याशी संवाद साधतात ज्यांशी यांची मते जुळत असतील किंवा बुद्धिमत्तेचा स्तर बरोबरीचा असेल.
 
फेब्रुवारी- या महिन्यात जन्म घेतलेल्या महिलांसोबत राहण्यासाठी आपल्या धीर ठेवावं लागतो, तर त्या खूप रोमँटिक सिद्ध होतात. फेब्रुवारीत जन्मलेल्या मुलींचा मूड जलद गतीने बदल असतो, म्हणून यांना समजून घेणे प्रत्येकाच्या जमत नाही. यांचा विचार करण्याची पद्धत सूक्ष्म निरीक्षण करणारी असते, यांच्यात त वरून ताक भात समजण्याची खुबी असते. पण हे लक्षात असू द्यावे यांच्यासोबत एकदा छळ केला तर यांना दुसर्‍यांदा यांच्याशी जुळवणे अशक्य आहे.
 
मार्च- या महिन्यात जन्म घेतलेल्या स्त्रिया सुंदर आणि आकर्षक असतात. या आपल्या काम आणि नात्यांप्रती समर्पित आणि विश्वासपात्र असतात. यांच्यासाठी कुणाच्या प्रेमात पडणे फार अवघड असतं.

एप्रिल- एप्रिलमध्ये जन्म घेतलेल्या मुली सगळ्यांमध्ये मिसळून जातात. यांच्या स्वत: प्रती दया भावही असतो. पण या रागात असल्यास याच्यापासून दूर राहणे योग्य ठरेल. जर आपण यांचा विश्वास जिंकला तर या स्त्रिया आपल्याला प्रसन्न ठेवण्याचा अतिशय प्रयत्न करतील. आणि पूर्ण आत्म्याने आपल्यासाठी समर्पित होऊन जातील.
 
मे- या महिन्यात जन्म घेतलेल्या स्त्रिया विश्वसनीय असतात. या आपल्या सिद्धान्तांवर ठाम असतात. यांच्या प्रेमात पडणे धोकादायक ठरू शकतं.
 
जून- जूनमध्ये जन्म घेतलेल्या मुली जिज्ञासू, कलात्मक आणि प्रेमळ असतात. विना विचार करता बोलण्यात विश्वास करतात अर्थात आधी बोलून टाकतात नंतर विचार करतात. या कोणत्याही व्यक्तीसमोर स्पष्ट बोलण्यावर विश्वास ठेवतात.

जुलै- या स्त्रिया इमानदार, सुंदर, गूढ आणि संवेदनशील असतात. मृदुभाषी असून सर्वांशी विनम्र असतात. कोणासोबतही मतभेद किंवा वाद यांना पटत नाही. यांच्यासोबत छळ केल्यास त्या आयुष्यभर विसरणार नाही अशामुळे आपण यांना आयुष्यभरासाठी गमावून बसाल.
 
ऑगस्ट- या महिन्यात जन्म घेतलेल्या स्त्रिया सुंदर मन असणार्‍या आणि आत्मकेंद्रीत असतात. यांच्याशी सांभाळून वागावे, कारण काही झाले तरी त्याचं जिंकणार. यांचा सेंस ऑफ ह्यूमर गजब असतो परंतू स्वत: वर थट्टा केलेला यांना मुळीच धकत नाही. यांना नेहमी मान-सन्मान आणि क्रेडिट घेणं आवडतं.
 
सप्टेंबर- या महिन्यात जन्म घेतलेल्या स्त्रिया दयाळू, अनुशासित आणि सुंदर असतात. यांच्यासोबत विश्वासघात करणार्‍यांना या विसरत नाही. यांना ठेच लागल्यास त्या सूड घेण्याचा प्रयत्न करतात. या स्त्रिया स्थायी नात्यांमध्ये विश्वास ठेवतात. आपल्या साथीदाराकडून यांना खूप अपेक्षा असतात. जर आपण स्वत:ला सिद्ध करून दिले तर यांना जिंकून घेतले समजा.

ऑक्टोबर- या महिन्यात जन्म घेतलेल्या स्त्रियांचे चरित्र मजबूत असतं. या भावुक होतात परंतू कोणासमोर रडणे यांना आवडतं नाही. या स्वत:ला किंवा स्वत:च्या भावना दुसर्‍यासमोर जाहीर होऊ देतं नाही कारण लोकं त्या समजू शकत नाही आणि वेळ पडल्यास या गोष्टीचा गैरवापर करतील असे यांना वाटतं. इतर स्त्रिया यांच्याशी ईर्ष्या पाळतात.
 
नोव्हेंबर- या महिन्यात जन्म घेतलेल्या स्त्रिया आपले खोटं लगेच पकडतात आणि इतरांपेक्षा एक पाऊल पुढेच असतात. यांच्यासोबत खेळणे संभव नाही. यांच्याशी सल्लाही तेव्हाच घ्या जेव्हा आपल्यात खरं काय ते ऐकण्याची हिंमत असेल.
 
डिसेंबर- डिसेंबर महिन्यात जन्म घेतलेल्या स्त्रिया खूप उत्सुक किंवा उतावळ्या स्वभावाच्या असल्या तरी भाग्यवान असतात. त्यांच्यात प्रत्येक परिस्थितीतून बाहेर पडण्याची क्षमता असते. त्यांना मूड ठीक करणे जमतं आणि मनाने अगदी प्रामाणिक असतात. या स्वत:च्या मनाने दुखीही होतात परंतू गुडलकमुळे यांच्या हक्कात असलेली प्रत्येक गोष्ट प्राप्त होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

आरती गुरुवारची

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

आरती बुधवारची

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments