जीवनामध्ये कितीही चढ-उतार आले, कितीही विचित्र घटना घडल्या तरीही खचून न जाता तुम्ही वैभव आणि प्रतिष्ठा मिळवताच. बरेचसे लोक संकटातून धाडसाने मार्ग काढतात, पण तुम्ही संकटालाच संधी समजता आणि निर्भयपणे त्यातून मार्ग काढतात.
आपल्याला पाहीजे ते मिळवण्यासाठी हवे तेवढे कष्ट प्रयत्न करण्याची तुमची तयारी असते आणि या ना त्या मार्गाने यश निश्चयाने तुम्ही मिळवून दाखवता. पण तुम्ही खुपच संयमी असल्यामुळे यशाने हुरळूनही जात नाही.
तुम्ही अभिमानी गोडबोल्या स्वभावाचे असून तुम्हाला नवनवीन ओळखी करून गप्पा मारायला खूप आवडत. प्रेम, मैत्री, सहानुभुती, योग्य समज, सहकार्य, संयमी, भरपूर कष्टाची तयारी, हेच राशी स्वभावातील गुण तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल.