Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कसा असतो वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

वेबदुनिया
WD
तुमचे प्रभावी सद्गुण म्हणजे तुमच्या अंगी असलेला लढवय्या बाणा कोण्त्याही प्रसंगात न डगमगता संघर्षात्मक टक्कर देण्याची ताकत असते. ती तुमच्याकडून घेण्यासारखी असते. तुमच्या मनातील सुखदुःखाच्या भावना आणि हाती घेतलेले कार्य यामध्ये सतत संघर्ष सुरू असतो.

इच्छाशक्ती प्रबळ असते. त्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत घाईगडबडीत तुम्ही कधीच काम करत नाहीत. तुम्ही सामर्थ्यशील असल्यामुळे कोणाच्या ताब्यात राहत नाही. तुमच्या या स्वभावामुळे तुमच्या घराला तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तुमचा पहाडासारखा आधार असतो हे नक्की.

WD


तुमची शारीरिक आणखी मानसिक शक्ती इतरांना लाजवेल अशी असते. कठीण प्रसंगात हार न मानणे. नाराज न होणे. हेच सद्गुण तुमचे आयुष्य तारायला संकटाना मारायला पुरेसे असते. म्हणूनच तुमच्या धाडसाचा इतरांना हेवा वाटतो.


WD


पहिला हार्ट अटॅक येऊन गेल्यावर अजून दोन शिल्लक आहेत, तोपर्यंत इकडची दुनिया तिकडे करून ठेवीन असे म्हणणारे तुम्ही दुःखात खचून न जाता मरणालाही हसत सामोरे जाण्याची धडाडी ठेवतात.

इतरांवरती टीका करणे, राग आवरणे, दुसऱ्यांचे मन जाणून घेणे, तडजोड हा प्रकार तुमच्याकडे थोडा कमीच. स्वतः बद्दल आत्मविश्वास त्यामुळे काय होते इतरांचे दोष दिसतात. त्यामुळे तुमची एकाकी होण्याची दाट शक्यता असते.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

शनिवारची आरती

संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments