Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुरुभ्रमंतीचे प्रत्येक राशींवर होणारे प‍रिणाम

Webdunia
मंगळवार, 24 जून 2014 (16:26 IST)
गुरुने  १९/0६/२0१४ रोजी सकाळी 0८ वा.५0 मि. गुरुचे त्याच्या उच्चराशीतील म्हणजे कर्क राशीतील भ्रमण केले आहे. १९/0६/२0१४ ते १४/0७/२0१५ या कालावधीत गुरुमहाराज कर्क राशीत राहणार आहेत; परंतु याच वर्षी शनि 0२/११/२0१४ रोजी आपल्या मित्र राशी तुळेतून शत्रू राशी वृश्‍चिकेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे पहिले पाच महिने गुरुची मिळणारी फळे नंतर तशीच राहणार नाहीत. त्यामध्ये काही प्रमाणात कमीपणा येण्याची शक्यता आहे. गुरु शनि एकमेकांना सम दृष्टीने पाहतात.
 

मेष : मेष राशीच्या चतुर्थस्थानात येणारा उच्चीचा गुरु आपल्या राहत्या घराच्या अडचणी सोडवण्यास मदत करणार आहे. घरात सुखशांती, समाधान यांची रेलचेल चालेल. वाहन तसेच जमीन खरेदीचे बेत पूर्ण होतील. नोकरदार वर्गाला तसेच व्यावसायिकांना जर आपल्या क्षेत्रात काही बदल करायचे असेल तर त्यात यश लाभेल. स्वभावात धार्मिकता लाभणार आहे. त्याचबरोबर त्याची अष्टमावरील दृष्टी काही अपघातग्रस्त भागातील तणाव कमी करेल.

कर्मस्थानावरील दृष्टी कामात यश देईल. व्ययस्थानामुळे आध्यात्मिक क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. जर आपणास काही त्रास असेल तर मंदिरात चण्याच्या डाळीचे दान करा, सर्व मंगल होईल.गुरुभ्रमंतीचे प्रत्येक राशींवर होणारे प‍रिणाम  गुरुने  १९/0६/२0१४ रोजी सकाळी 0८ वा.५0 मि. गुरुचे त्याच्या उच्चराशीतील म्हणजे कर्क राशीतील भ्रमण केले आहे. १९/0६/२0१४ ते १४/0७/२0१५ या कालावधीत गुरुमहाराज कर्क राशीत राहणार आहेत; परंतु याच वर्षी शनि 0२/११/२0१४ रोजी आपल्या मित्र राशी तुळेतून शत्रू राशी वृश्‍चिकेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे पहिले पाच महिने गुरुची मिळणारी फळे नंतर तशीच राहणार नाहीत. त्यामध्ये काही प्रमाणात कमीपणा येण्याची शक्यता आहे. गुरु शनि एकमेकांना सम दृष्टीने पाहतात.  
वृषभ : वृषभेच्या तृतीय स्थानातील गुरुचे भ्रमण आत्मविश्‍वास, नवीन ऊर्जा निर्माण करण्यास कारणीभूत होणार आहे. भावंडाचे सुख प्राप्त करण्यास मदत करणार आहे. प्रवासाचे बेत तडीस जाण्यास मदत होणार आहेत. त्यामुळे आपले नियोजन महत्त्वाचे आहे. त्याची विवाहस्थानावरील दृष्टी विवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मदत करेल. वैवाहिक सौख्यात उत्तम समाधान लाभेल. सामाजिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. व्यावसायिकांना भागीदारीत उत्तम सहकार्य लाभेल.

भाग्यस्थानावरील दृष्टीमुळे प्रवास उत्तम होतील. देवधर्म यांसारख्या यात्रा होतील. लाभस्थानावरील दृष्टीने शेजार्‍यांशी संबंध सुधारतील. देवी दुर्गाची पूजा करा, कुमारिकांना मिठाई व फळाचा प्रसाद देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या, सर्व कष्ट नाहीसे होतील. 
मिथुन : मिथुन राशीच्या धन स्थानात येणारा गुरू आर्थिक लाभाचे प्रमाण वाढवणार आहे. घरात सुखशांतीचे वारे वाहणार आहेत. घरात आनंदाची शुभ घटना घडून येतील. गुरुची षष्ठस्थानावरील दृष्टी आरोग्याबाबत सतर्कता राखावी लावणार आहे.

शत्रूला मित्र बनवण्याची कला हाच गुरु आपल्याला देणार आहे. अष्टमावरील दृष्टी अचानक धनलाभ देण्यास कारणीभूत होईल. कर्मस्थानावरील दृष्टी कामात यश किर्ती देण्यास मदत करेल. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रगती वाखणण्याजोगी असेल. मंदिरातील पुजार्‍याला पिवळे कपडे दान करा, मनासारख्या घटना घडतील.
कर्क : आपल्या राशीत आपला गुरू मानसिक समाधान तसेच यश देणारा आहे. सकारात्मकता, चैतन्य यांची प्रचिती येणार आहे. चारचौघांत आपली योग्यता वाढीस लागेल. आर्थिक लाभ होणार आहेत. गुरु चंद्राचा गजकेशरी योग होणार आहे. गुरुची पंचम स्थानावरील दृष्टी विद्यार्थी वर्गाला लाभदायक ठरेल. संततीसाठी प्रय▪करणार्‍या विवाहित जोडप्याला आशादायक वातावरण मिळेल.

प्रेमात मनासारखे यश लाभेल. विवाह स्थानावरील दृष्टीने इच्छुकांचे विवाह जमतील. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. भाग्यस्थानातील दृष्टीने भाग्य उजळणार आहे. अनोळखी लोकांच्या ओळखी होतील; परंतु त्यांच्याबरोबर व्यवहार करताना सावध राहणे आवश्यक आहे. लगेच कोणावर विश्‍वास टाकू नका. तरीही काही काळजी करण्यासारखे असल्यास गायीला चारा घाला, सर्व उत्तम होईल.
सिंह : आपल्या व्ययस्थानातील गुरुचे भ्रमण आध्यात्मिक प्रगतीस कारणीभूत होणार आहे. गुरुची सुखस्थानवरील दृष्टी घरातील वादविवाद कमी करणार आहेत. काही प्रमाणात असुरक्षितपणा जाणवेल तेव्हा स्वकर्तृत्वावर विश्‍वास ठेवा. जमल्यास प्रवास कमी केल्यास उत्तम होईल.

मनातील विश्‍वास वाढवणे गरजेचे आहे. संततीसाठी प्रयत्न करणार्‍या विवाहित दाम्पत्यांना जरा सबुरीने घ्यावे लागेल. डॉक्टरी इलाजाबरोबर दैविक उपायांना प्राध्यान्य द्या. प्रेमात साथीदारावर विश्‍वास ठेवा. अतिरेक करू नका. षष्ठस्थानातील द्ृष्टीमुळे खाण्यापिण्याचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्या. अष्टमातील दृष्टी अतिरिक्त फायदा देण्यास मदत करेल. श्रमाव्यतिरिक्त काही आमदानी होईल. साधुसंत, वृद्धांची सेवा करा, मनासारखे यश लाभेल.
कन्या : आपल्या राशीच्या लाभस्थानातील गुरुचे भ्रमण आपणास लाभदायक ठरेल. मोठय़ा भावंडाचे सुख लाभेल. शेजारी मित्र परिवार खूप मान देतील. पराक्रम स्थानावरील दृष्टी लेखी कामात यश देणार आहे. त्यांची पंचमावरील दृष्टी संतती सौख्य देणार आहेत.

प्रेमातील जोडीदार आपल्यासाठी जीव ओवाळून टाकणार आहे. विद्यार्थी वर्गाचे यश उत्तम होईल. स्पर्धेत भाग घेत असल्यास यश लाभेल. विवाह स्थानावरील दृष्टी वैवाहिक सौख्य देण्यास मदत करेल. भागीदारीतील व्यवहारात यश लाभेल. भागीदाराचे सहकार्य लाभेल. तरीही काही कष्ट असतील तर पिंपळाच्या झाडाला पाणी घाला, उत्तम यश लाभेल.
तुळ : आपल्या राशीच्या कर्मस्थातून होणारे गुरुचे भ्रमण करिअरच्या दृष्टीने फायद्याचे होईल. मनातील प्रगतीचा टप्पा आपण पार करू शकाल. नोकरीत तसेच व्यापारात मनासारख्या घटना घडतील. व्यापाराचे विस्तारीकरण करणे सोपे जाईल. नोकरीत बढती मिळण्याची संधी मिळेल.

धनास्थानावरील दृष्टीने आर्थिक लाभ होतील. सुखस्थानावरील गुरुची दृष्टी घरात शांतता, सुखसमाधान देण्यास मदत करेल. षष्ठस्थानातील दृष्टी मातुल घराण्याचे संबंध चांगले राखण्यास मदत करणार आहेत. विरोधक आपल्याला मान देणार आहेत. काही त्रास जाणवल्यास धार्मिक क्षेत्रात बदामाचे वाटप करा.
वृश्‍चिक : गुरुची भाग्यस्थानातील भ्रमण आपल्या भाग्यास चालना देणार आहे. त्याची आपल्या राशीवरील भ्रमण आरोग्याचा प्रश्न सोडवण्यास मदत करेल. आपल्यामध्ये एक नवीन उत्साह जोम याचा परिचय येणार आहे. आपल्या पायावर उभे राहण्यास मदत मिळेल.

धार्मिक कामानिमित्त प्रवास होतील. संताच्या गाठीभेटी होतील. अनोळखी व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नवीन परिचय लाभदायक होणार आहेत. मन योग क्रियेत रममाण होणार आहेत. पराक्रम स्थानावरील दृष्टी लेखन कामात यश देईल. भावंडाचे सहकार्य लाभेल. पंचमावरील दृष्टी संतती सुख देणार आहे. प्रेमात यश लाभेल. विद्यार्थी वर्गाला आपल्या प्रगतीचा टप्पा पार करण्यास मदत मिळेल. कष्ट असतील तर मास मदिरापासून दूर राहा. तांदळाचे दान करा.
धनु : गुरुचे अष्टम स्थानातील भ्रमण आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मन अशांत राहण्याची शक्यता आहे. तेव्हा कोणावर लगेच विश्‍वास ठेवू नका. स्वत:वर संयम ठेवा. आत्मनिर्भर राहणे उचित होणार आहे. गूढविद्या, गूढशास्त्र किंवा ज्योतिषविद्या यांची आवड निर्माण होऊन त्यात यश लाभेल.

गुरुचे व्ययस्थानातील दृष्टी आध्यात्मिक प्रगती देण्यास कारणीभूत होणार आहेत. धन स्थानावरील त्याची दृष्टी गुरू आर्थिक लाभ देण्यास मदत करणार आहे. अचानक धनलाभाचे योग येतील. त्याची चतुर्थ स्थानावरील दृष्टी कुटुंबसुख देणार आहेत. घरात काही नावीन्यपूर्ण शुभ घटना घडतील. आपल्या ऐपतीप्रमाणे तूप किंवा कापराचे दान केल्यास उत्तम यश लाभेल.
मकर : गुरुचे सप्तमस्थानातील भ्रमण विवाहोच्छुकांचे प्रश्न सोडवण्यास मदत करणार आहेत. गुरुची लग्न स्थानावरील दृष्टी आरोग्य चांगले राखण्यास मदत करणार आहेत. आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण होतील. फक्त आपण त्या वेळेला ओळखण्यास शिका.

समाजात मानसन्मान प्राप्त होईल. गुरुची लाभस्थानावरील दृष्टी लाभाचे प्रमाण वाढवणार आहेत. विद्वानाचा परिचय सोबत आपल्याला लाभणार आहे. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. गुरु पराक्रम स्थानावरील दृष्टी लेखन कामात यश देईल. जवळचे प्रवास चांगले होतील. दर गुरुवारी दत्तगुरूंचे दर्शन आपणास फायदेशीर होणार आहे.
कुंभ : गुरु महाराज आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून भ्रमण करणार आहेत. आरोग्यास घातक ठरतील असे पदार्थ टाळा. कोणत्याही प्रकारचे वादविवाद आपणासाठी योग होणार नाहीत. न्यायालयीन कामात यश लाभेल. शत्रू आपले मित्र बनतील. करत असलेल्या मेहनतीला यश लाभेल.

गुरुची कर्मस्थानावरील दृष्टी कामात यश देणार आहे. व्ययस्थानात आध्यात्मिक यश देणार आहे. धनस्थानावरील दृष्टी आर्थिक प्रश्न सोडवण्यास मदत करणार आहे. घरात काही शुभ घटनांचे संकेत मिळतील. चंदनाचे दान मंदिरात करा, सर्व कष्ट नाहीसे होतील.
मीन : स्वत:च राशीस्वामी गुरु पंचम स्थानातून भ्रमण करणार असल्याने संततीचा प्रश्न सुटेल. प्रेमिकांना मनासारखे यश प्राप्त होणार आहे. आपल्या आवडत्या विषयात मन रमणार आहे. गुरुची भाग्यस्थानावरील दृष्टी भाग्याचे दारे उघडतील.

गुरुचे लाभस्थानावरील दृष्टी लाभाचे प्रमाण वाढवतील. मित्र परिवार, नातेवाईकांचे सहकार्य लाभेल; परंतु त्याच्या अधीन होऊ नका. गुरुची आपल्या राशीवरील दृष्टी आरोग्य चांगले राखणार आहे. जोम, उत्साह यांचा परिचय येईल. धार्मिक कामात यश लाभेल. गोरगरीबांची सेवा करा, मनासारखे यश लाभेल.  

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments