Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुरूपुष्यामृत योगाचे महत्त्व

Webdunia
ज्योतिष शास्त्रात ग्रह, नक्षत्र, वार, करण, तिथी, मास आदी महत्त्वपूर्ण घटक असतात. त्यांचा प्रभाव आणि युती यांच्यामुळे शुभ व अशुभ काळ निर्माण होतो. यांच्याच सहाय्याने मानवाला इच्छित कार्यात यश मिळू शकते.

गुरूवारी पुष्य नक्षत्राचा दिवस आल्यास तो अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस व नक्षत्र यांच्या संयोगातून गुरूपुष्यामृत योग निर्माण होतो. कोणत्याही कार्यात ९९.५ टक्के यश मिळविण्यासाठी त्याची सुरवात या दिवशी केली जाते. २२ एप्रिल २०१० रोजी गुरूपुष्यामृत योग आहे.

 
ND
' गुरू' ग्रह ज्ञान व यशस्वितेचा प्रतीक आहे. म्हणूनच या योगाच्या काळात उच्च शिक्षण, तंत्रज्ञान शिक्षण, कला, साहित्य, नाट्य, वाद्य वा कोणत्याही विषयातील संशोधनाचा प्रारंभ, शैक्षणिक वा अध्यात्मिक गुरू निवडणे, तंत्र, मंत्र व दीक्षा घेणे, परदेश यात्रा, व्यापार, धार्मिक कार्याचा प्रारंभ आदी कार्ये करणे शुभ मानले जाते.

या मुहूर्ताचा सुक्ष्म अभ्यास केल्या या दिवशी साधणार्‍या योगात चंद्रबल, तारा बल, गुरू-शुक्रादी ग्रहांचा उदय-अस्त, ग्रहणकाल, पितृपक्ष व अधिक मास आदी बाबींचाही विचार केला जातो. म्हणूनच या योगात घराचे बांधकाम काढताना किंवा गृहप्रवेश करताना वा विवाह ठरवताना या सगळ्या बाबींचाही विचार करणे गरजेचे आहे.

२२ एप्रिल २०१० रोजी सर्वार्थ सिद्धी योग आहे. सकाळी सहा वाजता सुरू होऊन सायंकाळी ३.२२ वाजता तो संपेल. पुष्य नक्षत्र २१ एप्रिलला १६.३९ रोजी सुरू होऊन २२ एप्रिल रोजी २.२३ रोजी संपेल.

यंदाचा गुरूपुष्यामृत योग वैशाखात आलेल्या अधिक मासाने पुण्यवर्धक बनला आहे. ज्यांच्या कुंडलीत गुरू प्रतिकूल किंवा प्रभावहीन आहे त्यांनी या मुहूर्तावर पिवळ्या रंगाची डाळ, हळद, सोने आदी वस्तूंचे दान दिले पाहिजे.

 
ND
काही लोक या वेळी कल्याण हेतूने व गुरूकृपा प्राप्त करण्यासाठी धार्मिक यात्रा करून तेथे खाद्यपदार्थ व वस्त्रांचे दान करतात. काही जण धार्मिक अनुष्ठाने करून, ब्राह्मणभोजन घालूनही पुण्य मिळवतात.

नशीब बदलणारा, दारिद्र्य दूर करणारा आणि इच्छित फळ देणारा असा हा गुरूपुष्यामृत योग आहे.

संबंधित माहिती

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

पुढील लेख
Show comments