Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नक्षत्र आणि तुमची राशी

वेबदुनिया
ब्रह्मांडामध्ये अगणित तारेतारका, ग्रह, उपग्रह आहेत. दूरून पाहिल्यावर तेथे ताऱ्यांचे अनेक समूह दिसतात. या समूहांतून विविध आकृत्या तयार होतात. ताऱ्यांच्या या समूहालाच नक्षत्र म्हणतात. आकाशमंडळामध्ये २७ समूह आहेत, ज्यांना आपण २७ नक्षत्रे म्हणतो. या २७ नक्षत्रांना १२ भागांमध्ये विभाजित केलं गेलं आहे. त्या १२ भागांना आपण राशी म्हणतो. राशीचक्र म्हणजे नक्षत्रांचे वर्तुळ आहे ज्याच्या माध्यमातून सगळे ग्रह आकाशमंडळात गतिशील राहतात. नवग्रहांसोबत अनेक ज्ञात अज्ञात ग्रह आकाशात फिरत असतात. प्रत्येक ग्रह सतत कोणत्या ना कोणत्या राशीमध्ये असतो. भारतीय ज्योतीषशास्त्रामध्ये राशी ठरवण्यासाठी ३६० डिग्रीचा एक पथ मानला गेला आहे. ३६० डिग्रीला २७ भागांमध्ये विभागले जाते, म्हणजे प्रत्येक नक्षत्र १३ डिग्रीपेक्षा थोडे जास्त असते. याचप्रकारे ३६० डिग्रीला जर १२ने विभागले तर प्रत्येक राशी ३० डिग्रीची होते.

WD


आकाशमंडळात राशी चक्राच्या पहिल्या समूहाला अश्विनी म्हणतात. यानंतर भरणी, कृतिका ही नक्षत्रे येतात. भरणी व कृतिका नक्षत्र १३.३० + १३.३०=२६.६० डिग्रीने बनतात. म्हणजेच ४ डिग्रींची एक राशी बनते. जर यामध्ये कृतिकाचा प्रथम चरण जोडला तर मेष राशी निर्माण होते. याचप्रकारे आकाशमंडळाच्या परिभ्रमण पथावर प्रत्येकी ३०-३० डिग्रीवर एक एक राशीची निर्मिती होते.

WD
प्रत्येक राशीला विशिष्ट आकार, तत्त्व आणि स्वभाव विशेष गुण असतो. यापुढे आपण राशीच्या व्यक्तिगत रुपाबद्दल विस्ताराने माहिती घेऊच.

आपली राशी ओळख ा
आपल्या जन्माच्या वेळी आकाशमंडळात परिक्रमा करताना चंद्र ज्या राशीत असेल तीला आपली चंद्रराशी मानली जाते. आपल्या व्यक्तिमत्त्वावर राशीस्वामीच्या स्वभावातील गुणदोषांचा प्रभाव पडतो. पाश्चात्य ज्योतिषामध्ये सूर्यराशीला राशी मानले जाते. म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी सूर्य ज्या राशीत विराजमान असेल ती आपली राशी मानली जाते. सूर्य राशीमुळे आपण बाह्य व्यक्तिमत्त्व जाणून घेऊ शकतो. पण मन, बुद्घि, धन, सफलतेसाठी चंद्रराशीच महत्त्वपूर्ण असते.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

सर्व पहा

नक्की वाचा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments